ब्राझीलचा माजी फुटबॉलपटू रोनाल्डिन्हो याला कोविड-१९ची लागण झाली आहे. त्यामुळे त्याला बेलो होरिझोंटेमध्ये सेल्फ आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. रोनाल्डिनोने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन याची माहिती दिली आहे.
रविवारी (२५ ऑक्टोबर) पोस्ट केलेल्या व्हिडिओत तो म्हणाला की, “मी काही दिवसांपुर्वीच कोरोना चाचणी केली होती. आता माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आढळला आहे. पण मला अद्याप तरी कोरोनाशी संबंधित कसलीही लक्षणे आढळलेली नाहीत. मी आता बेलो होरिजोंटे हॉटेलमध्ये सेल्फ आयसोलेशमध्ये आहे.”
४० वर्षीय रोनाल्डिन्होने त्याच्या शानदार कारकिर्दीत त्याच्या संघाला चॅम्पियन्स लीग आणि विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो बार्सिलोना आणि एसी मिलानकडून मिडफिल्डर म्हणून खेळला आहे.
रोनाल्डिन्होला गतवर्षी ऑगस्ट महिन्यात नकली पासपोर्ट प्रकरणात पैराग्वेमध्ये ५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी नजरकैद करण्यात आले होते. मात्र तिथे तो त्याच्या भावासोबत एक महिना कारागृहात राहिला होता. त्यानंतरचे ४ महिने त्याने असुनसियन नावाच्या हॉटेलमध्ये घलवले होते. पुढे तो ब्राझीलला परतला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
शेवटी ठरलं ! ‘या’ तारखेला होणारा आयएसएलचा शुभारंभ
शंभर वर्ष जुन्या क्लबने बदलले नाव आणि लोगो; ‘या’ नावाने सहभागी होणार आयएसएलमध्ये
भारतीय संघाचा ‘स्टार स्ट्रायकर’ मुंबई सिटी एफसीकडे ; प्रशिक्षक लोबेरो यांनी केली घोषणा
शेफील्ड युनायटेडच्या मालकाने खरेदी केला भारतीय फुटबॉल क्लब; ‘हे’ आहे क्लबचे नवीन नाव






