टी20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. असे असूनही ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. रिषभ पंत याच्यासारखा मॅच विनर खेळाडू संघाबाहेर कसा काय बसू शकतो, याने पाँटिंगही हैराण आहे. खरं तर, भारताने आतापर्यंत ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या स्पर्धेत चार सामने खेळलेत, आणि मधल्या फळीत कोणताही डावखुऱ्या हाताचा फलंदाज नसूनही त्यांनी पंतला संधी दिली नाहीये. संघ अक्षर पटेलच्या फलंदाजीवर विश्वास ठेवून आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्यांनी अक्षरला पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले होते.
यावर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने मत मांडले आहे. तो म्हणाला की, “मी वास्तवात हैराण आहे की, तो खेळत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे, तो डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, ज्याची त्यांना मधल्या फळीत वेगवेगळ्या वेळी आवश्यकता पडू शकते. मी अक्षर पटेलबद्दल वाचत होतो की, संघ त्याच्या फलंदाजीचे समर्थन करत आहे, जर त्यांना मधल्या फळीत कोणत्याही डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाची आवश्यकता असेल, तर दोन फिरकीपटूंचा अर्थ आहे की, रिषभसाठी ती भूमिका साकारणे कठीण आहे. भारत काही प्रमाणात ऑस्ट्रेलियासारखा आहे, त्यांना वास्तवात माहिती नाहीये की, त्यांचा सर्वोत्तम संघ काय आहे. कदाचित यासाठीच की, त्यांना कधीच माहिती नव्हते की, त्यांना इथे कशा परिस्थितींचा सामना करावा लागेल.”
पाँटिंगने हेदेखील म्हटले की, रिषभ पंतला जर स्पर्धेच्या शेवटी संधी मिळाली, तर तो मोटी छाप सोडू शकतो. यादरम्यान त्याने पंतच्या ऑस्ट्रेलियातील कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कामगिरीबद्दलही चर्चा केली.
तो म्हणाला की, “परंतु पंतविषयी एक गोष्ट अशी आहे, ज्याबद्दल मला माहितीये, ती अशी की, तो एक मॅचविनर खेळाडू आहे. आपण पाहिले आहे की, त्याने ऑस्ट्रेलियात कसोटी आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये काय केले आहे. मात्र, कुणास ठाऊक, असंही होऊ शकतं की, त्याला संधी मिळेल आणि तो स्पर्धेच्या शेवटी मोठी कामगिरी करेल.”
अशात रिषभ पंतला या स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांमध्ये संधी मिळते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘अजिबात कारण देऊन चालणार नाही’, फेक फिल्डिंगवर बांगलादेशचा सल्लागार संतापला
बड्डे बाॅय विराट महिन्याला पितो ३६ हजार रुपयांचं पाणी…