---Advertisement---

विराट कधीच विसरणार नाही विश्वचषकातील ‘तो’ दिवस, इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत झाला व्यक्त

Virat-Kohli
---Advertisement---

टी20 विश्वचषक 2022चा महाकुंभमेळा संपून आता जवळपास 15 दिवस उलटले आहेत. 22 ऑक्टोबरला सुरू झालेल्या टी20 विश्वचषक स्पर्धेचा शेवट 13 नोव्हेंबर रोजी झाला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंड संघाने पाकिस्तान संघाला पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकाची ट्रॉफी उंचावली. या स्पर्धेचा किताब जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानला जात असलेला भारतीय संघ उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभूत झाला होता. मात्र, सुपर 12 फेरीतील सामन्यात भारतीय संघाने दमदार प्रदर्शन केले होते. त्यात भारताने पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवला होता. तसेच, सर्वाधिक 8 गुण मिळवत उपांत्य सामन्यात धडक दिली होती. यामध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली भलताच चमकला होता. आता त्याची एक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे.

भारतीय संघाने सुपर 12 फेरीत पाकिस्तान, नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे संघाला धूळ चारली होती. मात्र, दक्षिण आफ्रिका संघाने भारताला पराभूत केले होते. भारताने आपल्या टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेच्या अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली होती. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळण्यात आला होता. तसेच, आता एका महिन्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) याला हा सामना आठवला आहे. खरं तर, विराटने पाकिस्तानविरुद्धच्या त्या सामन्यात अविश्वसनीय खेळी साकारली होती. त्याने आपल्या दमावर भारताला विजय मिळवून दिला होता.

विराट कोहली इंस्टाग्राम पोस्ट
अशात विराट कोहली याने इंस्टाग्राम (Virat Kohli Instagram) अकाऊंटवरून या सामन्याच्या आठवणींना उजाळा दिला. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, “23 ऑक्टोबर, 2022 हा दिवस नेहमीच माझ्यासाठी खास असेल. क्रिकेटमध्ये अशी ऊर्जा यापूर्वी कधीच जाणवली नाही. काय सायंकाळ होती ती.”

https://www.instagram.com/p/ClaK_uAvxv9/?utm_source=ig_embed&ig_rid=6380c905-56fc-416b-954c-1ff85e9b2d68

विराटने मेलबर्न मैदानावर जवळपास 90 हजार प्रेक्षकांच्या समोर 53 चेंडूत नाबाद 82 धावांची तडाखेबंद खेळी केली होती. त्याने आपल्या खेळीच्या जोरावर भारताला विजय मिळवून दिला होता. या खास खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच, तो प्लेअर ऑफ द मंथ (महिन्यात सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू) देखील ठरला होता.

सामन्याचा आढावा
पाकिस्तान संघ या सामन्यात नाणेफेक गमावत पहिल्यांदा फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. यावेळी त्यांनी निर्धारित 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावा कुटल्या होत्या. हे आव्हान भारतीय संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावत पार केले होते. या सामन्यात विराट आणि हार्दिक पंड्या यांनी 113 धावांची भागीदारीही रचली होती. पंड्याने यादरम्यान 40 धावांचे योगदान दिले होते. (former captain virat kohli remembers india pakistan t20 world cup 2022 match after a month posted this instagram post)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाणी काढण्यासाठी सूर्या स्वतः उतरला मैदानात, व्हिडिओ होतोय व्हायरल
तब्बल 17 वर्षांनी रंगणार इंग्लंड-पाकिस्तान कसोटीचा थरार; स्टोक्स सेना पाकिस्तानमध्ये दाखल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---