भारत हा आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणून पुढे आला आहे. आतापर्यंत एकूण 8 संघ भारताशी भिडले, पण कुणालाच भारताचा विजयरथ रोखता आला नाही. भारतीय संघ विश्वचषक 2023 पॉईंट्स टेबलमध्ये अव्वलस्थानी विराजमान आहे. भारताने जर पुढील सामना गमावला तरीही, ते अव्वलस्थानीच राहतील. आता भारताला 15 नोव्हेंबर रोजी स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळायचा आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ऍडम गिलख्रिस्ट याने भारताला हरवण्याची पद्धत सांगितली आहे. त्याने इतर संघाना सल्ला दिला आहे की, भारताच्या काही खेळाडूंपासून सावध राहावे, तेव्हाच भारताला हरवले जाऊ शकते.
‘विराट कोहलीमुळे चेजमध्ये भारत सर्वोत्तम’
ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) फॉक्स क्रिकेटसोबत बोलताना म्हणाला, “भारतयी संघाची फलंदाजी नेहमीपासूनच खतरनाक राहिली आहे. मात्र, यावेळी भारताची गोलंदाजीही खूपच शानदार आहे. त्यामुळेच भारताला आतापर्यंत हरवले जाऊ शकले नाही. भारतीय संघ विराट कोहलीमुळे चेजमध्ये सर्वोत्तम आहे. भारताला चेज खूप आवडते. कारण, त्यांची फलंदाजी मजबूत आहे. मात्र, या विश्वचषकात जे पाहायला मिळाले, ते भारत डिफेंड करून सामना अधिक सहजतेने जिंकत आहे.”
‘तीन वेगवान गोलंदाजांचा सामना करणे कठीण’
ऍडम गिलख्रिस्ट याने भारतीय इतर संघांना सल्ला देत म्हटले की, “भारताविरुद्ध जर सामना असेल, तर भारताला पहिले गोलंदाजी करण्यासाठी बोलवावे. कारण, रात्र झाल्यानंतर भारताचे तिन्ही वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्याविरुद्ध खेळणे सोपे जात नाहीये. दुसरीकडे, कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजाही कमाल करत आहेत.”
भारतीय खेळाडूंची कामगिरी
यावरून स्पष्ट होते की, ऍडम गिलख्रिस्ट याने भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) तसेच तीन वेगवान गोलंदाजांपासून सांभाळून राहण्याचा सल्ला देत आहे. भारताच्या या खेळाडूंचे प्रदर्शन पाहिले, तर विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा स्पर्धेतील तिसरा आणि भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 8 सामन्यात 108.60 च्या सरासरीने 543 धावा केल्या आहेत.
तसेच, गोलंदाजांची कामगिरी पाहायची झाली, तर शमीने 4 सामन्यात 16 विकेट्स, बुमराहने 8 सामन्यात 15 विकेट्स आणि सिराजने 8 सामन्यात 10 विकेट्स घेतल्यात. तसेच, जडेजाने 8 सामन्यात 14, तर कुलदीपने 8 सामन्यात 12 विकेट्स घेतल्यात. (former cricketer adam gilchrist advice how defeat team india in odi world cup 2023 ind vs nz semi final)
हेही वाचा-
न्यूझीलंडच्या कॅप्टनची टीम इंडियाला वॉर्निंग? सेमीफायनलमधील टक्करविषयी म्हणाला, ‘आम्ही…’
खुलासा! मॅक्सवेलने मानलेली हार; म्हणालेला, ‘मला निवृत्त व्हायचंय’, पण फिजिओच्या ‘या’ सल्ल्याने घडवला इतिहास