---Advertisement---

जेव्हा एमएस धोनीने ‘या’ दिग्गजाचे न ऐकता केली होती दिनेश कार्तिकला गोलंदाजी; आता स्वत:च केलाय खुलासा

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 10:21 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी हा यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्याचबरोबर त्याने आपल्या नावे अनेक विक्रम ही केले आहेत. याबद्दलच माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने एमएस धोनीशी संबंधित असलेला एक मोठा किस्सा उघड केला आहे. त्याने २००४ मध्ये नेटमध्ये धोनीने दिनेश कार्तिकला कशी गोलंदाजी केली ते सांगितले. हे दोन्ही खेळाडू त्यावेळी भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाजासाठी स्पर्धा करत होते.

खरं तर, भारताचा अ संघ २००४ मध्ये केनिया आणि झिम्बाब्वेविरुद्ध सामने खेळण्यासाठी गेला होता. एमएस धोनी आणि दिनेश कार्तिक हे दोघेही या दौऱ्यावर गेले होते. त्याचवेळी आकाश चोप्रा एमएस धोनीचा रूममेट होता. यूट्यूबवर बोलत असताना आकाश चोप्रा दिनेश कार्तिकला म्हणाला की, “मला तुम्हाला २००४ च्या केनिया आणि झिम्बाब्वे दौऱ्यावर घेऊन जायचे होते. एमएस धोनी देखील त्या दौऱ्याचा एक भाग होता आणि मला तो अजूनही तो तुला गोलंदाजी करताना आठवतो. धोनी माझा रूममेट होता आणि मी त्याला सांगितले की, कार्तिकला गोलंदाजी करू नकोस, तो तुझा प्रतिस्पर्धी आहे. जर तुला गोलंदाजी करायची असेल, तर किमान फलंदाजी कर. पण धोनी म्हणाला की, नाही मला गोलंदाजी करायची आहे.”

धोनी आणि कार्तिकने केले होते २००४ मध्ये पदार्पण
एमएस धोनीने त्या तिरंगी स्पर्धेत सर्वाधिक ३६२ धावा केल्या होत्या. ज्यात दोन शतकांचा समावेश देखील होता. दिनेश कार्तिकने झिम्बाब्वेमध्ये तीन प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १६० धावा केल्या होत्या. कार्तिक आणि धोनी या दोघांनी २००४ मध्ये भारतीय संघात पदार्पण केले होते. दिनेश कार्तिकला प्रथम खेळण्याची संधी मिळाली होती. त्याने लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याचबरोबर धोनीने त्याच वर्षाच्या अखेरीस बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

धोनीला जरी दिनेशनंतर पदार्पण करण्याची संधी मिळाली असली, तरी त्याने संघात आपले स्थान पक्के केले होते. त्यामुळे कार्तिकला नियमित संधी मिळाली नाही आणि तो संघात तर कधी संघाच्या बाहेर जात राहिला. दिनेश कार्तिक म्हणाला की, जेव्हा एमएस धोनीने संघात त्याचे स्थान पक्के केले, त्यामुळे त्याचे संघात स्थान मिळणे खूप कठीण झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

-ENG vs IND 1st Test: नॉटिंघम कसोटी अनिर्णित; पावसामुळे अखेरचा दिवसाचा खेळ झाला रद्द

-नीरजने सुवर्ण पदक जिंकल्यावर भारतीय क्रिकेट संघाने केली ‘ही’ गोष्ट; ‘बुम बुम बुमराह’चे वक्तव्य

-भारताविरुद्धच्या कसोटीसाठी ‘त्या’ गोष्टींचा सर्वाधिक फायदा झाला, जो रुटचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---