एप्रिल महिन्याच्या अखेरपासून भारतीय कुस्तीपटू नवी दिल्लीच्या जंतर-मंतर येथे आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होते. शेवटी रविवारी (दि. 28 मे) कुस्तीपटूंचे हे आंदोलन उठवण्यात आले. कुस्तीपटूंसोबत झालेल्या कारवाईवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. अशात भारतीय संघाचा माजी खेळाडू अनिल कुंबळे कुस्तीपटू यांच्यावर झालेल्या कारवाईने निराश झाला आहे.
जंतर-मंतर (Jantar-Mantar) येथे दिल्ली पोलिसांनी विनेश फोगाट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि संगीता फोगाट यांच्यासह ऑलिम्पिक तसेच जागतिक अजिंक्यपद पदक विजेत्यांसोबत बळजबरी करून त्यांना बसमध्ये टाकले. कुस्तीपटू आणि त्यांच्या समर्थकांनी सुरक्षा घेरा तोडून महिला ‘महापंचायत’साठी नव्या संसद भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांच्यावर ही कारवाई केली.
बृजभूषण शरण सिंग (Brijbhushan Sharan Singh) यांच्यावर अल्पवयीन महिला कुस्तीपटूंसोबत लैंगिक अत्याचाराचा आरोप लावण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले, त्या दिवशी त्यांनी महिला महापंचायतीची मागणी केली होती. अशात संवादातून हा प्रश्न सोडवता आला असता, असे अनिल कुंबळे (Anil Kumble) याला वाटते.
काय म्हणाला अनिल कुंबळे?
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स (619) घेणारा चौथा खेळाडू असलेला कुंबळे मंगळवारी (दि. 30) म्हणाला की, “28 मे रोजी आपल्या कुस्तीपटूंसोबत जी हातापाई झाली, ते ऐकून मी खूपच निराश आहे. प्रत्येक गोष्ट संवादाने सोडवली जाऊ शकते, या प्रकरणावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आशा व्यक्त करतो.”
Dismayed to hear about what transpired on the 28th of May with our wrestlers being manhandled. Anything can be resolved through proper dialogue. Hoping for a resolution at the earliest.
— Anil Kumble (@anilkumble1074) May 30, 2023
सोमवारी (दि. 29 मे) ऑलिम्पिक नेमबाज अभिनव बिंद्रा, भारताचा यशस्वी फुटबॉलपटू सुनील छेत्री आणि भारतीय माजी अष्टपैलू इरफान पठाण यांनी कुस्तीपटूंविरुद्ध झालेल्या कारवाईची टीका केली होती. (former cricketer anil kumble reacts on action against protesting wrestlers)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका
WTC FINAL: टीम इंडियाने केला सरावाचा श्रीगणेशा! रोहित-विराटसह सारेच उतरले मैदानात