वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत खराब कामगिरी करणाऱ्या मोजक्या संघांमध्ये पाकिस्तान संघाच्याही नावाचा समावेश आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीचे सलग दोन सामने जिंकल्यानंतर पाकिस्तान पुढील तिन्ही सामन्यात पराभूत झाला आहे. पाकिस्तानने अखेरचा सामना सोमवारी (दि. 23 ऑक्टोबर) अफगाणिस्तानविरुद्ध खेळला. या सामन्यात त्यांना अफगाणिस्तानने 8 विकेट्सने पराभूत केले. अशात भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक गौतम गंभीर याने पाकिस्तानच्या लाजीरवाण्या पराभवामागील कारणांचा खुलासा केला आहे.
काय म्हणाला गंभीर?
अशात पाकिस्तानच्या सलग तिसऱ्या पराभवानंतर गौतम गंभीर (Gautam Gambhir) म्हणाला की, “आपण याविषयी आशिया चषकातही चर्चा केली होती. पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण. तुमचा दिवस फलंदाजी किंवा गोलंदाजीत खराब असू शकतो, पण क्षेत्ररक्षणात नाही. हे आशिया चषकापासून सुरू आहे. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणात कोणतीही सुधारणा पाहायला मिळाली नाहीये. माझ्या मते, या विश्वचकात पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण सर्वात साधारण आहे.”
‘ही’देखील मोठी समस्या
“पाकिस्तान संघ फिरकी गोलंदाजीतही संघर्ष करत आहे. या खेळपट्टीवर जिथे दव नव्हते आणि फिरकीपटूंसाठी फायदेशीर होती. पाकिस्तानचे तिन्ही फिरकीपटू एकही विकेट घेऊ शकले नाहीत. हीदेखील पाकिस्तान संंघासाठी चिंतेचा विषय आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
पाकिस्तानची तिसरी समस्या
पाकिस्तान संघाच्या तिसऱ्या समस्येविषयी बोलताना गंभीर म्हणाला, “पाकिस्तानची तिसरी चिंता आहे फलंदाजी. पाकिस्तानचे अव्वल फलंदाज एकसारखे आहेत. इफ्तिखार अहमदव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताही फलंदाज नाही, जो सामन्यात आपली जबाबदारी निभावू शकेल. क्रिकेट आता पूर्वीसारखे राहिले नाही, जिथे तुम्ही 270 किंवा 280 धावांचा बचाव कराल. दोन नवीन चेंडू, सपाट खेळपट्टी, यार्डाच्या आत पाच खेळाडू, अशात तुम्हाला सकारात्मक आणि आक्रमक क्रिकेट खेळावे लागेल.”
खरं तर, पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्यांनी अफगाणिस्तानशी भिडण्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव स्वीकारला होता. त्यापूर्वी त्यांनी पहिल्या सामन्यात नेदरलँड्सला 81 धावांनी आणि श्रीलंकेला 6 विकेट्सने पराभूत केले होते. (former cricketer gautam gambhir reveals the biggest flaw of babar azam team pakistan in world cup 2023)
हेही वाचा-
पॉवरप्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेला धक्क्यावर धक्के! आधी रीझा, मग ड्युसेन स्वस्तात बाद; फक्त…
दहा संघांचा वर्ल्डकप, मात्र गाजवतायेत टीम इंडियाचेच वाघ