---Advertisement---

हरभजनचा ‘माही’वर घणाघात; “एकट्या धोनीने वर्ल्डकप जिंकवला, मग बाकीचे काय …. प्यायला गेले होते का”

Harbhajan-Singh-And-MS-Dhoni
---Advertisement---

सध्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२चा १५वा हंगाम सुरू आहे. या हंगामातील २१ सामने पार पडले आहेत. या हंगामात भारतीय संघाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग क्रिकेट विश्लेषकाच्या भूमिकेत दिसत आहे. यादरम्यान त्याने आयसीसी विश्वचषक २०११बद्दल असे वक्तव्य केले आहे, ज्याने चर्चेला उधाण आले आहे. हरभजनने विश्वचषक जिंकण्याचे श्रेय एमएस धोनीला दिल्याबद्दल घणाघात केला आहे. तो यावेळी बोलताना म्हणाला की, ‘धोनीने विश्वचषक जिंकून दिला, तर मग बाकीचे खेळाडू काय… प्यायला गेले होते का?’ याबद्दल आता जोरदार चर्चा रंगली आहे.

काय म्हणाला हरभजन सिंग?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना हरभजन सिंग (Harbhajan Singh) म्हणाला की, “ऑस्ट्रेलिया संघ जेव्हा विश्वचषक जिंकतो, तेव्हा हेडिंग असते की, ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषक जिंकला. जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा हेडिंग आली की, एमएस धोनीने विश्वचषक जिंकवला. मग बाकीचे काय लस्सी प्यायला गेले होते का?” पुढे बोलताना तो म्हणाला की, “बाकी १० खेळाडूंनी काय केले होते? गौतम गंभीरने काय केले होते? मुद्दा असा आहे की, हा सांघिक खेळ आहे. जेव्हा ११ खेळाडू खेळत आहेत, आणि ७-८ चांगले खेळतील, तेव्हाच तुमचा संघ पुढे येईल.” हरभजन सिंगच्या या वक्तव्यानंतर तो चांगलाच चर्चेत आहे.

गौतम गंभीरनेही व्यक्त घेतला होता आक्षेप
यापूर्वी गौतम गंभीरही (Gautam Gambhir) असेच काहीसे म्हणाला होता. त्याने सोशल मीडियावर लिहिले होते की, २०११चा विश्वचषक संपूर्ण संघाने जिंकून दिला होता.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

वानखेडेवरील २०११ विश्वचषकाचा अंतिम सामना
विश्वचषक २०११ चा अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात पार पडला होता. यामध्ये श्रीलंका संघाने दिलेल्या २७४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून धोनीने विजयी षटकार खेचत संघाला विश्वचषक जिंकून दिला होता. यावेळी त्याने नाबाद ९१ धावा कुटल्या होत्या. तसेच, तो सामनावीर पुरस्काराचा मानकरीही बनला होता. दरम्यान, संघाने सुरुवातीला ३१ धावांवर २ मोठ्या विकेट गमावल्या होत्या. त्या दोन विकेट्स होत्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग होते. यानंतर गंभीरने तिसऱ्या विकेटसाठी युवा विराट कोहलीसोबत ८३ धावांची भागीदारी रचली होती. गंभीरने ९७ धावांचे योगदान दिले होते.

एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताला विजेतेपद
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची ख्याती संपूर्ण जगभर आहे. तो भारतीय संघाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने भारतीय संघाने २०११चा वनडे विश्वचषकासह २००७चा पहिला टी२० विश्वचषक आणि २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धा जिंकून दिल्या आहेत.

आयपीएल २०२२मधील चेन्नई संघाची कामगिरी
एमएस धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सला एकूण ४ किताब जिंकून दिले आहेत. मात्र, यंदाच्या २०२२च्या हंगामात चेन्नई संघाला खास कामगिरी करता आलेली नाहीये. त्यांना या हंगामातील सलग ४ सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. एकही विजय न मिळवल्यामुळे गुणतालिकेत त्यांचा संघ दहाव्या स्थानावर आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---