क्रिकेट जगतात एकापेक्षा एक खेळाडू आहेत आणि होऊनही गेलेत. काहींनी विस्फोटक फलंदाजीने नाव कमावलं, तर काहींनी भेदक आणि फिरकी गोलंदाजीने. मात्र, याव्यतिरिक्त क्षेत्ररक्षणातून नाव कमावणारेही काही दिग्गज क्रिकेटपटू होते. त्यापैकीच एक म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा सर्वोत्तम क्षेत्ररक्षक जाँटी ऱ्होड्स होय. गुरुवारी (दि. 27 जुलै) जाँटी ऱ्होड्स 54वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्याविषयी खास गोष्टी जाणून घेऊयात…
कारकीर्दीत 100हून अधिक झेल
जाँटी ऱ्होड्स (Jonty Rhodes) याची गणना दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1992मध्ये खेळला होता. हा वनडे सामना होता. जाँटीला आजही जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून ओळखले जाते. त्याने आपल्या वनडे कारकीर्दीत 100हून अधिक झेल घेण्याचा कारनामा केला आहे.
देशाकडून हॉकीही खेळला जाँटी
खास बाब अशी की, हॉकी या खेळातही जाँटी ऱ्होड्सने दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 1992मध्ये ऑलिम्पिक्समध्ये भाग घेतला होता. मात्र, त्याचा संघ क्वालिफाय करू शकला नव्हता. यानंतर त्याला 1996च्या ऑलिम्पिकवेळी ट्रायल देण्यासाठी बोलावण्यात आले होते. मात्र, दुखापतीमुळे तो यामध्ये अपयशी ठरला. त्यानंतर त्याने क्रिकेटमध्येच कारकीर्द घडवली. जाँटी सध्या आयपीएलमध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे. या संघात तो क्षेत्ररक्षक प्रशिक्षकाची भूमिका बजावत आहे.
जाँटीची कारकीर्द
जाँटी ऱ्होड्स याने त्याच्या संपूर्ण कारकीर्दीत एकूण 52 कसोटी सामने आणि 245 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 35.66च्या सरासरीने 2532 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 शतके आणि 17 अर्धशतकांचाही समावेश आहे. कसोटीत त्याने 34 झेल पकडले होते. याव्यतिरिक्त वनडेत त्याने 35.11च्या सरासरीने 5935 धावा केल्या आहेत. यामध्ये 121 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. यात त्याच्या नावावर 2 शतके आणि 33 अर्धशतकांची नोंद आहे. तसेच, क्षेत्ररक्षण करताना त्याने वनडेत 105 झेल पकडले होते. अशाप्रकारे जाँटीने कारकीर्दीत तब्बल 8 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
जाँटीने 20 वर्षांपूर्वी म्हणजेच 2003मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्याने बँकेतही नोकरी केली. तो स्टँडर्ड बँकेत अकाऊंट एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत होता. (former cricketer jonty rhodes greatest fielder of all time represent south africa in hockey know about him)
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs WI : वनडे मालिकेतील पहिला सामना कधी आणि कुठे पाहता येईल? सर्व माहिती एकाच क्लिकवर
देवधर ट्रॉफी: दक्षिण विभागाचा सलग दुसरा विजय, पश्चिम विभागाच्या पदरी पराभव