भारतीय संघ मागील काही काळापासून एका गोष्टीमुळे जास्तच चिंतेत आहे. ते म्हणजे खेळाडूंच्या दुखापती. भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी आता स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या याच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लक्षात आणून दिले आहे की, दुखापतीपूर्वीही खेळाडूंची कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. खरं तर, 1983 विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांना भारताच्या दुखापतग्रस्त खेळाडूंविषयी प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी मोठे भाष्य केले.
कपिल देव (Kapil Dev) म्हणाले की, जर प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले नाहीत, तर भारतीय संघ मजबूत होईल. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, “दुखापती या प्रत्येक खेळाडूच्या आयुष्याचा भाग आहेत. मला आशा आहे की, स्थिती सुधारेल. मला नेहमीच हार्दिक पंड्यासाठी चिंता वाटते. तो खूप लवकर दुखापतग्रस्त होतो. जर ते सर्व खेळाडू फिट झाले, तर भारतासारखा पक्का दुसरा संघच नाहीये.”
विशेष म्हणजे, भारतीय संघाचे अनेक हुकमी एक्के दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहेत. त्या खेळाडूंमध्ये रिषभ पंत, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. हे खेळाडू दुखापतीमुळे निवडीसाठी उपलब्ध नाहीयेत. भारतीय संघाची इच्छा आहे की, 2023 विश्वचषकापूर्वी सर्व मुख्य खेळाडूंनी पूर्णपणे फिट होऊन पुनरागमन करावे.
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केल्यानंतर सुट्टीवर आहे. गुजरात टायटन्स संघाने आयपीएल 2023 स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. मात्र, चेन्नई सुपर किंग्स संघाने 5 विकेट्सने विजय मिळवत पाचव्यांदा आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची कामगिरी केली होती.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर खेळताना दिसणार हार्दिक पंड्या
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (West Indies vs India) संघात 2 कसोटी, 3 वनडे आणि 5 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यातील वनडे मालिकेत पंड्या उपकर्णधारपद भूषवताना दिसणार आहे. त्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे की, वेस्ट इंडिजविरुद्धच्या 5 सामन्यांच्या टी20 मालिकेत पंड्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली जाऊ शकते. बीसीसीआयने अद्याप या दौऱ्यातील टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली नाहीये. (former cricketer kapil dev is worried for hardik pandya said this know here)
महत्वाच्या बातम्या-
MPL फायनलवर सावट! पावसामुळे खेळ रद्द झाल्यावर कुणाला मिळाणार ट्रॉफी
फिकीर नॉट! अहमदाबादेत IND vs PAK सामना झाला नाही, तर कुठे होईल महामुकाबला? लगेच वाचा