Kieron Pollard England Cricket Team: क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकाराचा म्हणजेच टी20 विश्वचषक 2024चा 10वा हंगाम अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. हा टी20 विश्वचषक वेस्ट इंडिज आणि अमेरिका या देशांमध्ये आयोजित केला जाणार आहे. अशात या विश्वचषकापूर्वी मोठी बातमी समोर येत आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी20 विश्वचषकासाठी नवी रणनीती आखली आहे, ज्यामुळे त्यांना मागील टी20 विश्वचषक 2022मध्ये यश मिळाले होते. वृत्तांनुसार, ईसीबीने वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी कायरन पोलार्ड याला मर्यादित षटकांच्या कोचिंग स्टाफमध्ये अस्थायीरीत्या सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.
वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) टी20 क्रिकेटचा महान खेळाडू राहिला आहे. तसेच, कॅरेबियन स्थितीविषयी त्याला चांगली माहिती आहे. अशात जर तो इंग्लंड संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील झाला, तर निश्चित रीत्या टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत इंग्लंड (England) क्रिकेटला फायदा मिळवून देऊ शकतो.
टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडची योजना
तसं पाहिलं, तर ही इंग्लंड संघाची जुनी रणनीती आहे, जी त्यांनी आजमावली आहे. खरं तर, मागील टी20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियात पार पडला होता. त्यावेळी ईसीबीने (ECB) ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज माईक हसी याला आपल्या कोचिंग स्टाफचा भाग बनवले होते. त्याचा फायदाही त्यांना मिळाला होता. हसीच्या मदतीने इंग्लंड क्रिकेट संघाला 2022चा टी20 विश्वचषक जिंकून दिला होता. आताही तोच विश्वचषक आपल्याकडे राखण्यासाठी इंग्लंड संघ पुन्हा एकदा आपल्या जुन्या रणनीतीचा वापर करण्याचा विचार करत आहे.
Kieron Pollard is set to be the consultant coach of England in the T20 World Cup 2024. [The Telegraph] pic.twitter.com/2zkVbX0Zpd
— Johns. (@CricCrazyJohns) December 22, 2023
इंग्लंडचा फॉर्म खराब
मागील काही काळापासून इंग्लंडचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील फॉर्म खूपच खराब राहिला आहे. त्यांनी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत गतविजेते म्हणून एन्ट्री केली होती. ते पुन्हा एकदा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत उतरले होते. मात्र, जवळपास अर्ध्या स्पर्धेदरम्यान इंग्लंडचा संघ गुणतालिकेत तळाशी म्हणजेच दहाव्या स्थानी विराजमान झाला होता. तसेच, साखळी फेरी संपण्याच्या खूप आधीच इंग्लंड संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला होता.
पोलार्डवर सोपवणार मोठी जबाबदारी!
त्यानंतर आता इंग्लंड संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे, जिथे टी20 विश्वचषक 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्धही इंग्लंडने पहिल्या वनडे मालिकेत पराभवाचा सामना केला आहे. त्यानंतर आता टी20 मालिकेतही त्यांना 3-2ने पराभव पत्करावा लागला. अशात आता टेलिग्राफच्या वृत्तानुसार, ईसीबीने पोलार्डला आगामी टी20 विश्वचषकासाठी इंग्लंडच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा सहाय्यक प्रशिक्षक बनवण्याचा आग्रह केला होता, जो पोलार्डने स्वीकारला आहे. मात्र, याविषयी अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाहीये.
असे असले, तरीही पोलार्ड इंग्लंडच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होण्याविषयी चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (former cricketer kieron pollard may be the coach of england cricket team for the t20 world cup 2024)
हेही वाचा-
‘मला भारतीय आर्मीबरोबर आणखी वेळ घालवायचा आहे’, भारतीय क्रिकेटरने व्यक्त केली अपेक्षा
पहिल्यांदाच क्रिकेटमध्ये वापरले Electra Stumps, खासियत पाहून तुमचेही डोळे विस्फारतील