येत्या सप्टेंबर महिन्यात आशिया चषक 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. मात्र, या स्पर्धेचे आयोजन नेमकं कुठं होणार, हे अद्याप निश्चित नाहीये. एकीकडे बीसीसीआय भारतीय संघ पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाहीये, दुसरीकडे, पाकिस्तान आपल्या आडमुठेपणावर ठाम आहे. अशातच आता पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने त्याच्याच देशावर निशाणा साधला आहे. तो म्हणाला आहे की, पाकिस्तानात येण्यास प्रत्येक संघ घाबरेल.
काय म्हणाला आसिफ?
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आसिफ (Mohammad Asif) याने एका युट्यूब चॅनेलवर बोलताना याविषयी मत मांडले. तो म्हणाला की, “देशाची राजकीय स्थितीत सध्या चांगली नाहीये. कोणताही संघ पाकिस्तानात येण्यास घाबरेल. माझ्या मते, आशिया चषक होणार नाही. ज्याप्रकारची स्थिती आहे किंवा मला वाटते की, आशिया चषक यूएई किंवा श्रीलंकेत शिफ्ट होईल.”
खरं तर, मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या वादावर अद्याप कोणताही तोडगा निघू शकला नाहीये. हा वाद सोडवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयला पुन्हा एकदा यावर चर्चा करण्यासाठी बोलावले जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेचे उपाध्यक्ष पंकज खिमजी यांना या मुद्द्यावर तोडगा काढण्याची जबाबदारी सोपवली गेली असल्याचे सांगण्यात आले आहे.
भारतीय संघाला श्रीलंकेत आशिया चषक खेळण्यात कोणतीही समस्या नाहीये. भारतीय बोर्ड यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आवडते ठिकाण यूएई आहे. मात्र, बीसीसीआयचे मत आहे की, सप्टेंबर महिन्यात अधिक तापमान असल्यामुळे तिथे खेळणे योग्य होणार नाही.
पाकिस्तानमध्ये एकदाच झाले आशिया चषकाचे आयोजन
पाकिस्तानने आतापर्यंत फक्त एकदाच आशिया चषकाचे आयोजन केले आहे. सन 2008च्या आशिया चषकातील सर्व सामने पाकिस्तानात खेळले गेले होते. अंतिम सामना भारत विरुद्ध श्रीलंका संघात खेळला गेला होता, जो श्रीलंका संघाने 100 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. (former cricketer mohammad asif said any team will be little apprehensive in coming to pakistan asia cup )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
WTC Final : हर्षा भोगलेंनी निवडली सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हन, 8व्या स्थानासाठी ठेवले दोन पर्याय
‘शुबमन गिल आता प्रिन्स नाही…’, मोठे कारण देत भारतीय दिग्गजाने वेधले क्रिकेटविश्वाचे लक्ष्य