विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. साखळी फेरी असो किंवा बादफेरीतील उपांत्य सामना भारत सर्वत्र चमकदार कामगिरी करत आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने बुधवारी (दि. 15 नोव्हेंबर) कायमच बादफेरीत भारताला नडणाऱ्या बलाढ्य न्यूझीलंडचा 70 धावांनी धुव्वा उडवला. तसेच, विश्वचषक 2023 अंतिम सामना गाठला. भारताला अंतिम सामन्याचे तिकीट मिळवून देण्यात आधी विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी बॅटमधून, तर नंतर चेंडूतून मोहम्मद शमी यांनी सिंहाचा वाटा उचलला. 7 विकेट्स घेणाऱ्या शमीला सामनावीर पुरस्कार मिळाला. मात्र, इंग्लंडचे माजी कर्णधार आणि समालोचक नासिर हुसेन यांनी रोहित शर्मा याला भारताचा खरा हिरो म्हटले.
काय म्हणाले नासिर?
भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा ‘परफेक्ट कार्यक्रम’ करताच नासिर हुसेन (Nasser Hussain) आणि मायकल एथर्टन चर्चा करत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, टी20 विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारताच्या पराभवानंतरच रोहितने बदलाची सुरुवात केली होती. ते म्हणाले, “उद्या तुम्ही विराट कोहलीच्या हेडलाईन्स, श्रेयस अय्यरच्या हेडलाईन्स, मोहम्मद शमीच्या हेडलाईन्स पाहाल, पण भारताचा खरा हिरो आणि ज्याने भारतीय क्रिकेटची संस्कृती बदलली, तो रोहित शर्मा आहे. जेव्हा भारत इंग्लंडपेक्षा खराब क्रिकेट खेळून टी20 विश्वचषकाचा उपांत्य सामना हारला, तेव्हा त्याने दिनेश कार्तिकला म्हटले की, आपल्याला बदलावे लागेल.”
‘बोलणे वेगळे आणि करणे वेगळे’
नासिर हुसेन यांच्यानुसार, बादफेरीतील सामन्याच्या दबावातही रोहित शर्माने ड्रेसिंग रूमला सांगितले होते की, कसे खेळायचे आहे. नासिर हुसेनने पुढे म्हटले, “बोलणे एक असते आणि करणे वेगळे असते. आज माझ्यासाठी खरा हिरो रोहित ठरला. पहिल्यांदा स्पर्धेत त्याची चाचणी झाली. साखळी फेरी आणि बादफेरीत खूप अंतर असते. इथेही निर्भीड होऊन खेळले जाऊ शकते का? कर्णधार मैदानावर आला आणि ड्रेसिंग रूमला दाखवले की, आपल्याला तसेच खेळायचे आहे.”
भारताचा सलग 10वा विजय
भारतीय संघ विश्वचषक 2023 (Team India World Cup 2023) स्पर्धेत खेळलेल्या सर्व 10 सामन्यात अजिंक्य राहिला आहे. साखळी फेरीत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने सर्व 9 सामने जिंकले होते. त्यानंतर आता उपांत्य सामन्यातही त्याने विजय मिळवला आहे. 19 नोव्हेंबर रोजी विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा उपांत्य सामना होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल, तो अंतिम सामन्यात भारताचा सामना करेल. (former cricketer nasser hussain statement rohit sharma real hero for team india ind vs nz)
हेही वाचा-
सेमी नाही, शमी फायनल! डायरेक्ट 1975 नंतर रचला कहर विक्रम, जगात कुणीच नाही केली अशी डेरिंग
टीम इंडियाचा विजयरथ फायनलमध्ये! न्यूझीलंडला दिली World Cup Semi Final मध्ये मात