2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीचे (ICC Champions Trophy) यजमानपद पाकिस्तानकडे आहे. या मेगा स्पर्धेची सुरूवात (19 फेब्रुवारी) पासून होणार आहे. शुभारंभ सामन्यातच पाकिस्तान-न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) संघ आमने-सामने असणार आहेत. तत्पूर्वी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू रशीद लतीफने (Rashid Latif) पाकिस्तान संघाला सल्ला दिला आहे.
रशीद लतीफने (Rashid Latif) पाकिस्तानच्या इंग्रजी दैनिक डॉनला सांगितले की, “क्रिकेटवेड्या देशासाठी हा एक रोमांचक काळ आहे. या मेगा स्पर्धेत जगातील अव्वल संघ सहभागी होतील. पाकिस्तानला या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळावी, यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे सातत्याने लॉबिंग केल्याबद्दल मी पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्या प्रयत्नांचे कौतुक करतो. भारत त्यांचे सामने यूएईमध्ये खेळेल आणि ते त्यांचे काम आहे, पाकिस्तानने फक्त आक्रमक क्रिकेट खेळण्यावर लक्ष केंद्रित करावे.”
पुढे बोलताना लतीफ म्हणाला की, “मला विश्वास आहे की, आमचे खेळाडू घरच्या परिस्थितीत खेळण्याच्या संधीचा फायदा घेतील. आमच्याकडे गूढ गोलंदाज अबरार अहमद, सुफियान मुकीम आणि फैसल अक्रमसारखे उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहेत. शिवाय, सलमान अली आगा हा एक मौल्यवान खेळाडू आहे.”
दरम्यान, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत झालेल्या घोट्याच्या दुखापतीतून सॅम अयुब (Saim Ayub) अजून बरा होत असल्याने, लतीफने पाकिस्तानच्या सलामी जोडीबद्दल चिंता व्यक्त केली. तो म्हणाला, “मला सॅम अयुबच्या दुखापतीची काळजी वाटते आहे आणि अब्दुल्ला शफीकही फॉर्ममध्ये नसल्याने आम्ही थोडे दुविधेत आहोत. हे सर्व खेळाडू प्रतिभावान असले तरी, योग्य संयोजन शोधणे हे एक आव्हान असू शकते. निवडकर्त्यांचे काय मत आहे हे मला माहीत नाही, पण कदाचित ते फखर आणि शान मसूद यांना सलामी जोडी म्हणून निवडतील. पण आपल्याला त्यासाठी वाट पहावी लागेल.”
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चे वेळापत्रक –
19 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, नॅशनल स्टेडियम, कराची
20 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
21 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची
22 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
23 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
24 फेब्रुवारी – बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
25 फेब्रुवारी – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
26 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
27 फेब्रुवारी – पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम, रावळपिंडी
28 फेब्रुवारी – अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
1 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, नॅशनल स्टेडियम, कराची
2 मार्च – न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
4 मार्च – सेमीफायनल 1, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
5 मार्च – सेमीफायनल 2, गद्दाफी स्टेडियम, लाहोर
9 मार्च – फायनल, गद्दाफी स्टेडियम, लाहोर (भारत फायनलमध्ये पोहोचल्यास ठिकाण दुबई असेल)
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद शमीच्या पुनरागमनाबद्दल इरफान पठाणची प्रतिक्रिया! म्हणाला, “संघ व्यवस्थापन…”
Champions Trophy; भारताच्या सामन्यांचा पाकिस्तानला होणार बंपर फायदा
आयपीएल 2025पूर्वी केकेआरचे वाढले टेन्शन, सर्वात महागड्या खेळाडूला झाली दुखापत!