पाकिस्तान क्रिकेट संघाला 1992 मध्ये पहिले-वहिले विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार म्हणजे इम्रान खान होय. त्यामुळे इम्रान खान यांची गणना पाकिस्तान आणि जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम कर्णधारांमध्ये केली जाते. इम्रान खान यांच्याप्रमाणेच सध्या बाबर आझम हादेखील चांगलीच वाहवा लुटत आहे. मात्र, असे असूनही पाकिस्तानचा माजी फलंदाज सलमान बट याला जेव्हा सर्वोत्तम कर्णधार निवडण्यास सांगितले, तेव्हा त्याने पाकिस्तानच्या कुठल्याच कर्णधाराचे नाव घेतले नाही. विशेष म्हणजे, त्याने भारतीय संघाच्या महान कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंग धोनी याचे नाव घेतले.
कर्णधार एमएस धोनीच सर्वोत्तम
सलमान बट (Salman Butt) याने एका पॉडकास्ट शोदरम्यान बोलताना म्हटले की, “हे पाहा जर मागील 15 वर्षांबाबत बोलायचे झाले, तर त्यामध्ये जगातील सर्वोत्तम कर्णधार एमएस धोनी आहे. तो अव्वल क्रमांकाचा कर्णधार आहे. तो सर्वप्रकारे शानदार कर्णधार आहे. तुम्ही पाहा तो कधीच मैदानावर गरजेपेक्षा जास्त उत्साही दिसत नाही. तो कधीही खेळाडूंशी भांडताना किंवा रागावताना दिसत नाही. संपूर्ण संघ उड्या मारत असेल, पण तो आपल्या जागेवर उभा राहतो.”
तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार
एमएस धोनी (MS Dhoni) आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007मध्ये टी20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर भारताने 2011मध्ये वनडे विश्वचषकात धोनीने 28 वर्षांचा ट्रॉफीचा वनवास संपवत भारतीय संघाला चॅम्पियन बनवले होते.
त्यानंतर, 2013मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीही जिंकली होती. अशाप्रकारे तो आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार बनला होता. धोनीने 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 178 सामने जिंकण्याची कामगिरी केली. याव्यतिरिक्त धोनीने आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाला पाच वेळा चॅम्पियनही बनवले आहे. धोनीने आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेत खेळणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याला पुन्हा मैदानावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. (former cricketer salman butt picks mahendra singh dhoni as best captain of world cricket read more)
महत्त्वाच्या बातम्या-
विक्रमवीर तिलक! पदार्पणाच्या सामन्यात दाखवला बॅटिंगचा दम, रोहितचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड उद्ध्वस्त
ना यशस्वी, ना मुकेश; माजी दिग्गजाने ‘या’ खेळाडूला म्हटले भारताचे भविष्य; म्हणाला, ‘भारताला जे पाहिजे, ते…’