पाकिस्तान क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी याच्या खांद्यावर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आफ्रिदीला पाकिस्तानचा अंतरिम मुख्य निवडकर्ता म्हणून नेमले गेले आहे. त्याने मोहम्मद वसीम अब्बासी यांची जागा घेतली आहे. या बातमीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वीच बदलला होता अध्यक्ष
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मागील काही दिवसांपूर्वी बदल होताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वीच रमीज राजा (Ramiz Raja) यांच्या जागी नजम सेठी (Najam Sethi) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Chairman) नवीन अध्यक्ष बनले होते. अशात संघाचा मुख्य निवडकर्ता बदलण्यात आला आहे. शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) याच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
PCB Management Committee has appointed former Pakistan captain Shahid Afridi as the interim Chair of the Men’s National Selection Committee. Other members of the panel are: Abdul Razzaq and Rao Iftikhar Anjum. Haroon Rashid will be the Convener.
— Pakistan Cricket (@TheRealPCB) December 24, 2022
इंग्लंडविरुद्ध गमवावी लागली मालिका
खरं तर, पाकिस्तान संघाला मायदेशात इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत 0-3ने पराभव पत्करावा लागला होता. या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये एकच खळबळ माजली होती. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहेत.
शाहीन आफ्रिदीसोबत आहे खास नाते
खरं तर, शाहीन आफ्रिदी आणि शाहिद आफ्रिदी (Shaheen Afridi And Shahid Afridi) यांच्यात खास नाते आहे. शाहीन हा आफ्रिदीच्या मुलीचा होणार पती आहे. त्यांचा साखरपुडाही झाला आहे. अशात आफ्रिदीकडे मुख्य निवडकर्त्याचे पद आल्यामुळे हे सासरे-जावयाची ही जोडी पाकिस्तान क्रिकेटला उंचीवर नेण्याचा प्रयत्न करेल.
शाहिद आफ्रिदीची कारकीर्द
शाहिद आफ्रिदी याच्या कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने पाकिस्तानकडून 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 1716 धावा, वनडेत 8064 धावा आणि टी20त 1416 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 11 शतके झळकावली आहेत. तसेच, 47 अर्धशतकांचीही बरसात केली आहे. (former cricketer shahid afridi becomes pcb new chief selector replace mohammad wasim abbasi)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बीसीसीआयला वाटतेय भीती! आयपीएल संघांनी उचललेल्या ‘या’ पावलामुळे बोर्डाला फुटलाय घाम
करन आयपीएल इतिहासातील महागडा खेळाडू, पण चर्चा फक्त त्याच्या गर्लफ्रेंडचीच; लव्हलाईफबद्दल वाचाच