भारतीय संघाचा नव्या दमाचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यासाठी 2023 हे वर्ष आतापर्यंत चांगले ठरले आहे. त्याने या हंगामात शतकांचा पाऊस पाडत जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंचे लक्ष वेधले आहे. यामध्ये भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर याचाही समावेश आहे. जाफरने गिलच्या यशामागे त्याच्या वडिलांचा मोठा हात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सुरुवातीपासून त्याला मार्गदर्शन केले आणि अजूनही करत आहेत. गिलसाठी मागील एक वर्ष हे चांगले राहिले आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात शतक झळकावले आहे. त्यानंतर त्याने आयपीएल 2023 हंगामातही शानदार कामगिरी केली आहे.
काय म्हणाला वसीम जाफर?
वसीम जाफर (Wasim Jaffer) याने शुबमन गिल (Shubman Gill) याच्या यशामागील मोठे कारण सांगितले आहे. गिलच्या जबरदस्त फॉर्मविषयी बोलताना जाफरने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “त्याच्या चांगल्या कामगिरीमागे एक कारण असेही आहे की, त्याचे वडील नेहमी त्याच्यासोबत आहेत. त्याच्या वडिलांनी सर्व जबाबदारी सांभाळली आहे. आजकाल सोशल मीडियाच्या युगात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कोणाचेही लक्ष विचलित करू शकतात. आपण सचिन तेंडुलकर याच्याबाबतही पाहिले आहे की, त्याचा भाऊ नेहमी त्याच्यासोबत असायचा. गिल खूप चांगला खेळाडू आहे, पण हे त्याच्या चांगल्या प्रदर्शनामागील एक कारण आहे.”
आयपीएल 2023 (IPL 2023) हंगामात गिलने 3 शतके आणि 4 अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक 890 धावा चोपल्या आहेत. या हंगामात त्याची सरासरी 59.33 आणि स्ट्राईक रेट हा 157.80 इतका राहिला आहे. जाफरने सोशल मीडियाच्या चुकीच्या प्रभावाबाबत बोलताना म्हटले की, “सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जो एका सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर शिखरावर बसवतो. तसेच, एका सामन्यात खराब कामगिरी केल्याने क्रूरतेने ट्रोलही करे. अशात ही चांगली गोष्ट आहे की, त्याचे वडील बरोबर आणि चुकीचे मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी त्याच्यासोबत आहेत.”
खरं तर, शुबमन गिल सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या (World Test Championship 2023) अंतिम सामन्याची तयारी करत आहे. तो भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासोबत सलामीला मैदानावर उतरू शकतो. अशात त्याचा फॉर्म पाहता भारतीय चाहत्यांना आणि जगभरातील क्रिकेटप्रेमींना त्याच्याकडून डब्ल्यूटीसी अंतिम (WTC Final) सामन्यात भरपूर अपेक्षा असतील. (former cricketer wasim jaffer credit success of shubman gill to his father read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेजलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील झालेला पठ्ठ्या आहे तरी कोण, भारताची डोकेदुखी वाढवणार का?
Cricket Ball: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वापरला जाणार Duke Ball, ‘या’ 3 चेंडूंनी आख्खं जग खेळतं क्रिकेट