IND vs AUS World Cup 2023 Final। विश्वचषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामन्यासाठी अवघे क्रिकेट विश्व आतुर झाले आहे. जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडिअम असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात 5 वेळचा विश्वविजेता ऑस्ट्रेलिया आणि 2 वेळचा विश्वविजेता भारत संघात भिडणार आहे. मात्र, विश्वचषकात पाकिस्तानकडून सातत्याने गरळ ओकण्यात आली आहे की, नाणेफेकीवेळी भारतीय कर्णधार रोहित शर्मा नाणे दूर फेकतो आणि सामनाधिकारी त्याच्या बाजूने निकाल देतात. कारण, विरोधी संघाचा कर्णधार नाणे पाहायला जात नाही. यावर टीका करत भारताचा माजी खेळाडू वसीम जाफर याने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, त्याने सांगितले आहे की, रोहितने नाणेफेक कशी केली पाहिजे.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim Jaffer) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून प्रत्येक क्रिकेटप्रेमी हसल्याशिवाय राहणार नाही. कारण, व्हिडिओत दिसते की, एका सामन्यात कर्णधार उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) नाणे इतक्या उंच आणि दूर फेकतो की, नाणे जवळपास 20 मीटर दूर जाऊन पडते. यावेळी नाणेफेकीसाठी उपस्थित सामनाधिकारी, नाणेफेक प्रेझेंटर आणि विरोधी संघाचा कर्णधारही हे पाहून हसू लागतात.
हा व्हिडिओ शेअर करत वसीम जाफरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात आशा आहे की, रोहित शर्मा उद्या नाणेफेकीवेळी बिनबुडाचे वक्तव्य करणाऱ्यांची थट्टा उडवण्यासाठी असे करेल.” आता हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस पडला असून सर्वत्र जोरदार व्हायरल होत आहेत.
Hope @ImRo45 does this at the toss tomorrow just to make fun of all the baseless theorists 😂 #INDvAUS #CWC2023Final pic.twitter.com/M8npYpQrPn
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 18, 2023
खरं तर, पाकिस्तान संघाच्या अनेक माजी क्रिकेटपटूंनी याविषयी भाष्य केले होते की, नाणेफेक स्पायडर कॅमेऱ्यात दाखवला गेला पाहिजे. याव्यतिरिक्त पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी सामनाधिकाऱ्यांवरही आरोप लावले होते की, ते रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या बाजूने निकाल देतात. मात्र, सत्य तर हे आहे की, विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित 5 वेळा नाणेफेक हारला आहे. अशात अशी चर्चा आहे की, रोहित 5 वेळा नाणेफेक हारूनही सामनाधिकारी रोहितच्या बाजूने निकाल देतात असे कसे म्हटले जाऊ शकते. तसेच, या व्हिडिओद्वारे वसीम जाफरने पाकिस्तानच्या ट्रोलर्सची बोलती बंद करण्याचे काम केले आहे. मात्र, रोहित असे काहीही करणार नाही हे नक्की. (former cricketer wasim jaffer tells how rohit sharma to tossed in world cup 2023 final to make fun of all the baseless theorists)
हेही वाचा-
World Cup 2023: Final पूर्वी मैदानी पंचाचे नाव ऐकूनच भारतीय चाहत्यांना भरली धडकी; म्हणाले, ‘पनवती अंपायर’
IND vs Aus Final: नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम किती धावा करू शकते डिफेंड? स्वत: पीच क्यूरेटरनेच सांगितला आकडा