World Cup 2023 Final: विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आमने-सामने होते. नरेंद्र मोदी स्टेडिअम येथे पार पडलेल्या या सामन्यात भारतीय संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का बसला. यानंतर एकीकडे कोट्यवधी भारतीयांचा कंठ दाटून आला होता, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त आनंद पाकिस्तानी चाहत्यांना झाला होता. पाकिस्तानच्या लोकांचा आनंद पाहून असे वाटले, जसे की, अंतिम सामन्यात पाकिस्ताननेच भारताला पराभूत करत विश्वचषक जिंकला आहे. मात्र, असे काहीही नाहीये. जेव्हा अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला विश्वचषकाच्या सामन्यात पराभूत केल्यानंतरही असेच झाले होते. त्यावेळी भारतीय चाहत्यांनी अफगाणिस्तानपेक्षा जास्त जल्लोष केला होता. अशात यावर भारतीय माजी दिग्गज गौतम गंभीर आणि पाकिस्तानी माजी दिग्गज वसीम अक्रम व्यक्त झाले.
काय म्हणाले दोन दिग्गज?
भारत आणि पाकिस्तानचे (India And Pakistan) क्रिकेटप्रेमी एकमेकांच्या पराभवाचा जल्लोष करताना दिसतात. तसेच, याबाबत चर्चा करताना पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) आणि भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी ‘असे करणे चुकीचे’ असल्याचे म्हटले.
वसीम अक्रम याने विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर स्पोर्ट्सकीडा या क्रिकेट वेबसाईटच्या एका कार्यक्रमात म्हटले की, “तुम्ही निराश झाले नाही पाहिजे, काही नाही, एक वाईट दिवस होता. मात्र, तुम्ही संपूर्ण स्पर्धेत कमालीचे प्रदर्शन केले आणि अजूनही तुम्ही सर्वोत्तम संघ आहात. ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही स्वत: 1999मध्ये या स्थितीतून गेलो आहोत. त्यावेळी सोशल मीडिया नव्हता, पण आम्ही वृत्तपत्र वाचत नव्हतो, टीव्ही पाहत नव्हतो, पण आजच्या काळात सोशल मीडियापासून दूर राहणे कठीण आहे. तसेच, हे भारत-पाकिस्तानचे लोक, जे एकमेकांचा पराभव पाहून जल्लोष करतात, त्यांना पाहून एक उदाहरण आठवते की, बेगानों की शादी में अब्दुल्ला दीवाना.”
‘एकमेकांच्या पराभवावर आनंद साजरा करणे चुकीचे’- गौतम गंभीर
यावेळी गौतम गंभीरही वसीम अक्रम याच्या मताशी सहमत दिसला. त्याने याच कार्यक्रमात म्हटले की, “आपल्या विजयाचा आनंद साजरा करा, दुसऱ्यांच्या पराभवाचा आनंद साजरा करण्यात काहीच अर्थ नाही. मग तो भारत असो किंवा पाकिस्तान. जेव्हा पाकिस्तान हारतो, तेव्हा आमच्याकडे आनंद साजरा करतात. तसेच, जेव्हा भारत हारतो, तेव्हा पाकिस्तानात आनंद साजरा करतात. हे खूपच चकीचे आहे. माझ्या मते, ही गोष्ट बदलण्याची खूपच गरज आहे, कमीत कमी खेळामध्ये तर खूपच गरजेचे आहे.”
वसीम अक्रम पुढे बोलताना म्हणाला की, “मी नाव घेणार नाही, पण दोन्ही देशांमधील काही प्रसिद्ध लोक असे आहेत, जे या गोष्टीचे भांडवल करतात. तुम्ही तुमच्या देशासाठी देशभक्त आहात आणि आमच्या. हे इथेच संपवा. जेव्हाही संघर्ष करत असाल, तेव्हा एकमेकांसोबत चांगल्याप्रकारे वागा. शेवटी हा फक्त एक खेळ आहे.”
आता गौतम गंभीर आणि वसीम अक्रम यांच्या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. तसेच, सोशल मीडिया युजर्सही या दिग्गजांचे विधान व्हायरल करत आहेत. (former cricketers wasim akram and gautam gambhir said stop celebrating each other defeat)
हेही वाचा-
भारताकडून सलग 2 सामने हारताच ऑस्ट्रेलिया संघात 6 धक्कादायक बदल, मॅक्सवेलसह ‘हे’ वर्ल्डकप स्टार परतणार मायदेशी
मरतानाही विश्वविजेता कर्णधार कमिन्स काढणार विराटच्या विकेटची आठवण, स्वत:च केलाय खुलासा