भारतीय क्रिकेट संघाने 2023 विश्वचषकात चमकदार कामगिरी केली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत 10 पैकी 10 सामने जिंकून नवा इतिहास रचला आहे.
आता भारताला विश्वविजेतेपदासाठी अंतिम सामना जिंकणे आवश्यक आहे. जगभरातील क्रिकेटपटू भारताच्या या शानदार संघाचे कौतुक करत आहेत, परंतु काही लोक असे आहेत जे भारतीय संघाचे यश पाहून चुकीचे बोलत आहेत.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज सिकंदर बख्त (Sikandar Bakht) याने एका वृत्तवाहिनीवर बोलताना दावा केला आहे की, रोहित शर्मा (Rohit Sharma) टॉसमध्ये फसवणूक करत आहे. या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या म्हणण्यानुसार, “रोहित हे नाणे जाणूनबुजून लांब फेकतो जेणेकरून विरोधी कर्णधाराला ते दिसू नये आणि रोहितच्या सोयीनुसार टॉस बदलता येईल. तुम्ही बारकाईने पाहिल्यास, जेव्हा जेव्हा रोहित शर्मा नाणेफेकीसाठी नाणे फेकतो तेव्हा तो इतर कर्णधारांच्या तुलनेत नाणे खूप पुढे टाकतो, ज्यामुळे नाणे इतके पुढे जाते की विरोधी कर्णधाराला ते दिसत नाही. त्यात काय आहे”
माजी पाकिस्तानी खेळाडूच्या या निराधार वादग्रस्त वक्तव्यावर पाकिस्तानच्या माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडूंनी त्याला फटकारले आहे. वसीम अक्रम, (Wasim Akram) मोईन खान, (Moien Khan) शोएब मलिक (Shoaib malik) यांच्यासह अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी या वक्तव्याला पूर्णपणे निरुपयोगी म्हटले आहे. वसीम अक्रम एका पाकिस्तानी चॅनलशी बोलताना म्हणाला की, “नाणे कुठे पडायचे हे कोण ठरवतं? मॅच प्रायोजकत्वामुळे ते तिथे ठेवले गेले आहे. हे सर्व ऐकून मला खूप लाज वाटते. त्यावर चर्चा करणेही व्यर्थ आहे.”
त्याचवेळी पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक मोईन खानही याच कार्यक्रमात म्हणाला की,”ते बोलले ते एकदम चुकीचे आहे. असे काही होत नाही.”
या दोघांशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक याने एका कार्यक्रमात सांगितले की, “आम्ही या विषयावर का बोलत आहोत? हे खूप निरुपयोगी आहे. भारतीय संघाने चांगले क्रिकेट खेळले आहे, हे स्वीकारले पाहिजे.” (Wasim Akram sharp reply to Sikandar Bakht toss-fixing accusation Said Hearing all this I)
म्हत्वाच्या बातम्या
एमएसएलटीएच्या वतीने 25हजार डॉलर पुरुष आयटीएफ टेनिस स्पर्धेचे आयोजन, भारतीय खेळाडूंना एटीपी गुण मिळवण्याची संधी
IND vs AUS Final: ना विराट, ना रोहित; पॅट कमिन्सने ‘या’ भारतीयाला म्हटले ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धोका