इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. कडक बायो बबल असताना देखील खेळाडूंना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. अशा कठीण काळातही बीसीसीआयने खेळाडूंना घरी पोहचवण्याची व्यवस्था केली. परदेशी खेळाडू आणि प्रशिक्षक स्टाफ सर्व आपल्या घरी सुरक्षित पोहोचले आहेत. अशातच माजी इंग्लिश कर्णधाराने घरी पोहोचतच एक मन जिंकणारे ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
इंग्लंड संघाचा माजी कर्णधार तसेच आयपीएल २०२१ स्पर्धेत समालोचकाची भूमिका बजावणारा केविन पीटरसन आपल्या घरी सुरक्षित पोहोचला आहे. केविन पीटरसन भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. तो अनेकदा हिंदीमध्ये ट्विट करून चाहत्यांचे मन जिंकत असतो. तसेच त्याने आताही हिंदी भाषेत ट्विट केले आहे.
त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “मी भारत सोडलं असं होऊ शकतं. तरीही मी अशा एका देशाचा विचार करीत आहे, ज्याने मला खूप प्रेम आणि आपुलकी दिली आहे. कृपया सर्वांनी सुरक्षित राहा. हा कठीण काळ लवकरच निघून जाईल; पण त्यासाठी आपण सावधगिरी बाळगावी लागेल.”
https://twitter.com/KP24/status/1391981782707449856?s=20
केविन पीटरसनचे हे ट्विट पाहून अनेक भारतीय क्रिकेट चाहते भारावून गेले. अनेकांनी त्याचे कौतुकही केले. एका युजरने प्रतिक्रिया देत लिहिले की, ‘तुम्ही तर आम्हाला भावुक केले.’ तसेच दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘वाह काय हिंदी बोलता तुम्ही.’
केविन पीटरसनला असेही वाटते की आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामन्यांचे आयोजन युएईमध्ये नव्हे तर इंग्लंडमध्ये केले. जावे. कारण भारतीय संघ आता इंग्लंड दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ही मालिका १४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. ही मालिका संपल्यानंतर भारतीय संघाला काही वेळ मिळू शकतो. आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण २९ सामने खेळले गेले आहेत. तर ३१ सामने अजूनही शिल्लक आहेत.
ही स्पर्धा केव्हा आणि कुठे होणार याबाबत बीसीसीआयने कुठलाही खुलासा केला नाहीये. इंग्लंडव्यतिरिक्त युएई, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया देखील आयपीएल स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी उत्कुस आहेत. ही स्पर्धा बीसीसीआयला खेळवण्यात अपयश आले तर बीसीसीआयला याचा मोठा फटका बसू शकतो. त्यांचे तब्बल २५०० कोटींचे नुकसान होऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआयची खास योजना, शास्त्री नव्हे तर ‘हा’ दिग्गज असणार संघ प्रशिक्षक?
क्रिकेटची खेळपट्टी ते राजकारणाचा फड गाजवणारे भारतीय शिलेदार, विश्वविजेत्या खेळाडूचाही समावेश
वयाची पन्नाशी ओलांडलेला ‘हा’ क्रिकेटपटू हॉलिवूड अभिनेत्रीवर झालाय घायाळ, सोशलवर रंगली तुफान चर्चा