भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वेगाने बरा होत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, ऑगस्टमध्ये होणाऱ्या मालिकेत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करू शकतो. मात्र, बुमराहच्या पुनरागमनापूर्वी भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठे भाष्य केले आहे. रवी शास्त्रींनी भारतीय संघाला चेतावणी दिली आहे. यावेळी त्यांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याचे उदाहरणही दिली आहे.
काय म्हणाले शास्त्री?
रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या पुनरागमनाविषयी घाई केली नाही पाहिजे. वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) लक्षात घेऊन जर त्याचे लवकर पुनरागमन झाले, तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. आपल्याला त्याच्या पूर्ण फिट होण्याची प्रतीक्षा पाहिली पाहिजे.
ते म्हणाले की, “बुमराह एक महत्त्वाचा खेळाडू आहे, पण जर तुम्ही विश्वचषक लक्षात ठेवून त्याच्याबाबत घाईत निर्णय घेतला, तर तुम्ही त्याला शाहीन आफ्रिदीप्रमाणे पुढील 4 महिन्यांसाठी गमवाल. त्यामुळे तुम्हाला याबाबत खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.”
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याचे उदाहरण देत शास्त्री म्हणाले की, “आफ्रिदीचे लवकर संघात पुनरागमन केले होते. त्यानंतर त्याला आणखी चार महिने क्रिकेटपासून दूर व्हावे लागले होते.”
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सप्टेंबर 2022पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो टी20 विश्वचषक 2022, बॉर्डर-गावसकर मालिका (2023), जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना (2023) या मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा भाग नव्हता. याव्यतिरिक्त तो आयपीएल 2023च्या संपूर्ण हंगामालाही मुकला होता.
भारतात यावर्षी वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. तसेच, जसप्रीत बुमराह हा संघाचा मुख्य गोलंदाज आहे. अशात त्याच्या पुनरागमनामुळे भारतीय संघाच्या गोलंदाजीला मजबूती मिळेल. त्यामुळे बीसीसीआय बुमराहच्या फिटनेसवर काम करत आहे. बीसीसीआयला आशा आहे की, ऑगस्टमध्ये आयर्लंड आणि सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशिया चषकात भारतीय संघाचा भाग असेल.
बुमराहची कारकीर्द
जसप्रीत बुमराह याने भारतीय संघाकडून 30 कसोटी सामने, 72 वनडे सामने आणि 60 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने 2.69च्या इकॉनॉमी रेटने 128 विकेट्स घेतल्या आहेत. वनडेत त्याने 4.63च्या इकॉनॉमी रेटने 121 विकेट्स घेतल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याने टी20त 6.62च्या इकॉनॉमी रेटने 70 विकेट्स घेतल्या आहेत. (former head coach ravi shastri warning on jasprit bumrah return ahead of world cup 2023)
महत्वाच्या बातम्या-
आता बास झालं! निवडकर्त्यांनी पुन्हा दुर्लक्ष करताच सरफराजने तोडले मौन, थेट इंस्टाग्रामवरून साधला निशाणा
इंग्लंडच्या महिला क्रिकेटरचा भीमपराक्रम! ऍशेसमध्ये द्विशतक ठोकत 88 वर्षे जुना विक्रम केला उद्ध्वस्त






