---Advertisement---

विराट कोहलीच्या मदतीला धावून आला भारताचा हा दिग्गज कर्णधार

On: शुक्रवार, ऑगस्ट 2, 2019 3:33 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मुख्य प्रशिक्षक म्हणून जर रवी शास्त्रींच असतील तर आनंद होईल, असे विंडीज दौऱ्यावर जाण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटले होते. यावर अनेकांनी विविध मते मांडली आहे. काही जणांनी विराटवर टीका देखील केली आहे.

पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराटचे समर्थन केले आहे. हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार गांगुली झी बांगला फुटबॉल लीगच्या पारितोषिक वितरण समारंभादरम्यान पत्रकारांशी बोलताना म्हणाला, ‘तो (विराट) कर्णधार आहे. त्यामुळे त्याला बोलण्याचा अधिकार आहे.’

भारताचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अन्य सपोर्ट स्टाफ यांचा बीसीसीआशी असलेला करार 2019 विश्वचषकानंतर संपणार होता. पण त्यांच्या करारात 45 दिवसांची वाढ केली आहे.

पण त्यानंतर बीसीसीआय भारताच्या वरिष्ठ संघासाठी नव्याने प्रशिक्षकाची आणि अन्य सपोर्ट स्टाफची नियुक्ती करणार आहे. यासाठी बीसीसीआयने 30 जूलैपर्यंत अर्ज देखील मागवले होते.

भारतीय संघासाठी मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्यासाठी सल्लागार समीतीमध्ये कपिल देवबरोबरच माजी महिला कर्णधार शांता रंगास्वामी आणि माजी प्रशिक्षक अंशुमान गायकवाड यांचा समावेश आहे. हे मध्य-ऑगस्टमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत.

याआधी भारताच्या वरिष्ठ संघासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण, सचिन तेंडुलकर आणि गांगुली यांच्या सल्लागार समीतीने रवी शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली होती. पण नंतर त्यांचा परस्पर हितसंबंधाचा मुद्दा समोर आल्याने सध्या बीसीसीआयने तात्काळ कपिल देव, गायकवाड आणि रंगास्वामी यांचा सल्लागार समीतीमध्ये समावेश केला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

काय सांगता! अंपायरने ऍशेसच्या पहिल्याच दिवशी दिले ७ चूकीचे निर्णय

…म्हणून जेम्स अँडरसनने मागितली इंग्लंड संघाची माफी

तब्बल १५ महिन्यांनी कसोटीत पुनरागमन करत स्मिथने तोडला विराट कोहलीचा हा विक्रम

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment