बर्मिंगहॅम। गुरुवारपासून (1 ऑगस्ट) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ऍशेस मालिका सुरु झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना एजबस्टन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला जोरदार धक्का बसला.
त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनला सामन्यादरम्यान उजव्या पायाच्या पोटरीच्या दुखापतीचा त्रास झाला आहे. त्यामुळे त्याला सामना सुरु झाल्यानंतर केवळ चार षटकेच गोलंदाजी करता आली.
त्याला चौथे षटक टाकताना पोटरीच्या दुखापतीचा त्रास होत असल्याने तो मैदानाबाहेर गेला. त्याच्या पोटरीचे स्कॅन करण्यात आले. त्यामुळे तो पहिल्या सत्रानंतर मैदानात उतरलेला नाही.
यामुळे त्याने इंग्लंड संघाची माफी मागितल्याचा खूलासा त्याचा संघसहकारी स्टुअर्ट ब्रॉडने पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर केला आहे.
ब्रॉडने सांगितले की ‘तो(अँडरसन) या दुखापतीमुळे निराश आहे. त्याने सर्व गोलंदाजांची माफी मागितली. पण खरंच याची काहीच गरज नव्हती. त्याला वाटत होते की त्याने गोलंदाजांना निराश केले आहे पण असे काही नाही. दुखापती या वेगवान गोलंदाजाच्या आयुष्याचा एक भाग असतात.’
तसेच पुढे ब्रॉडने अँडरसनच्या दुखापतीबद्दल सांगितले की ‘आम्हाला अजून सर्वकाही(दुखापतीबद्दल) कळालेले नाही. आम्ही आशा करतो की आमच्या अपेक्षेपेक्षा त्याच्या दुखापतीची बातमी चांगली असेल.’
या सामन्यात अँडरसनने पहिल्या दिवशी 4 षटके गोलंदाजी करताना 3 षटके निर्धाव टाकले होते. तसेच केवळ 1 धाव दिली होती. तसेच तो मैदानाबाहेर गेल्यानंतर ब्रॉड आणि ख्रिस वोक्सने इंग्लंडच्या गोलंदाजीची धूरा जबाबदारीने पेलली. ब्रॉडने पहिल्या डावात सर्वाधिक 5 आणि वोक्सने 3 विकेट्स घेतल्या. तसेच बेन स्टोक्स आणि मोईन अलीेने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 284 धावा करता आल्या. त्यांच्याकडून स्टिव्ह स्मिथने 144 धावांची शतकी खेळी केली. तर पहिल्या दिवसाखेर इंग्लंड पहिल्या डावात बिनबाद 10 धावांवर खेळत आहेत.
अँडरसनला कौउंटी क्रिकेटमध्ये लँकाशायरकडून डरहम विरुद्ध खेळताना 2 जूलैला पोटरीची दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्याला मागील महिन्यात झालेल्या आयर्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यालाही मुकावे लागले होते. परंतू तो पहिला ऍशेस सामना खेळण्यासाठी फिट झाला होता. मात्र त्याला पुन्हा या दुखापतीचा त्रास झाला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल १५ महिन्यांनी कसोटीत पुनरागमन करत स्मिथने तोडला विराट कोहलीचा हा विक्रम
–आता मास्टर-ब्लास्टर करणार या चित्रपटात भूमिका…
–ऍशेसच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडला जोरदार धक्का, हा खेळाडू गेला मैनादाबाहेर