भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारताने जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) नेतृत्वाखाली पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. तत्पूर्वी भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांच्या मते जसप्रीत बुमराहकडे डेनिस लिली, अँडी रॉबर्ट्स आणि रिचर्ड हॅडली सारख्या वेगवान गोलंदाजांचे गुण आहेत, परंतु तो वेगवान गोलंदाजांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देणारा स्वतःचा वारसा तयार करत आहे.
‘ग्रेग चॅपल’ने (Greg Chappell) सिडनी मॉर्निंग हेराल्ड’मध्ये लिहिले की, “जसप्रीत बुमराहच्या कौशल्यांचे संयोजन त्याला एका वेगळ्या लीगमध्ये आणते. त्याच्याकडे माल्कम मार्शलची परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता, लिलीची (आक्रमकता), रिचर्ड हॅडलीचे (नियंत्रण), रॉबर्ट्सची (रणनीती), वसीम अक्रम आणि वकार युनिस (रिव्हर्स स्विंग), ग्लेन मॅकग्राची (अचूकता), डेल स्टेनचे मिश्रण आहे.”
चॅपेल म्हणाले, “पुर्वीच्या महान खेळाडूंनी पाया घातला असताना, बुमराह स्वतःचा वारसा तयार करत आहे. वेगवान गोलंदाजांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याची क्षमता असलेला वारसा. लिली एका योद्धासारखा होता. आक्रमकता आणि मानसशास्त्रीय किनार यांचा उत्तम संगम त्याच्यात होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मी अनेकदा त्याचा सामना केला आहे आणि त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांविरूद्ध मी त्याची परीक्षा घेतली आहे.”
पुढे बोलताना चॅपेल म्हणाले, “लिलीमध्ये अशी लाईन-लेन्थ गोलंदाजी करण्याची क्षमता होती, ज्यामुळे फलंदाजाला बराच काळ त्रास झाला. बुमराह या बाबतीत थोडा मागे आहे पण त्याच्या वेगळ्या गोलंदाजीच्या ॲक्शनने तो प्रभावी यॉर्कर्स आणि बाऊन्सरने फलंदाजाला अडचणीत आणून तो लिलीशी जुळतो.”
शेवटी बोलताना चॅपेल म्हणाले, “बुमराहने केवळ 30 कसोटी सामन्यात 21.03च्या सरासरीने 151 विकेट्स घेतल्या आहेत. विविध परिस्थितीत उत्कृष्ट कामगिरी करण्याची त्याची क्षमता मार्शलच्या वर्चस्वाची आठवण करून देणारी आहे. बुमराहकडे जुन्या चेंडूला रिव्हर्स स्विंग करून चेंडू सिम करण्याची आणि स्विंग करण्याची अद्भुत क्षमता आहे. मार्शलच्या विरोधात फलंदाजांनाही अशाच अनिश्चिततेचा सामना करावा लागला. आज फलंदाजही बुमराहबद्दल अशाच भावना व्यक्त करतात.”
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs AUS; गाबा कसोटीत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकाॅर्ड
शिक्कामोर्तब! चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रीड मॉडेल’ अंतर्गतच होणार, भारताचे सामने या देशात खेळले जातील
ट्रॅव्हिस हेड गाबामध्ये भारताविरुद्ध काहीच करू शकणार नाही, आकडेवारी खूपच खराब!