भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज त्याचे कौतुक करत असतात. आता भारताचे दोन वर्षे प्रशिक्षकपद सांभाळलेल्या ग्रेग चॅपल यांनी ‘कॅप्टनकूल’चे जोरदार कौतुक केले आहे.
चॅपल म्हणाले की धोनी मैदानातील कोणत्याही कठीण परिस्थीतीत आश्चर्यकारक निर्णय घेतो. हा गुण त्याला त्याच्या समकालीन क्रिकेटपटूंपासून वेगळा करतो.
ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपल २००५ पासून २००७ पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. ग्रेग चॅपल यांचा कार्यकाळ वादांनी भरलेला होता. त्यांनी सौरव गांगुलीला संघातून बाहेर केले होते, तसेच कर्णधारपदावरुन काढले होते, असे अरोप त्यांच्यावर होतात.
पण आता ग्रेग चॅपल भारतीय क्रिकेटवर आपले मत मांडत असतात. यावेळी त्यांनी भारताचा माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीची प्रशंसा केली आहे.
ग्रेग चॅपलने लिहले की, भारतीय उपखंडात अनेक शहरे आहेत जिथे प्रशिक्षणाच्या सुविधा नगण्य आहेत. तेथील तरुण गल्लीत आणि खाली जमिनीवर कोणताही प्रशिक्षण नसताना खेळतात. तेथे खेळूनच भारतात अनेक दिग्गज खेळाडू झाले. ते सुद्धा याच गल्ल्यांमध्ये क्रिकेट खेळायला शिकले. धोनीसुद्धा त्या स्टार खेळाडूंपैकीच एक आहे. तो झारखंडमधील रांची या शहरातील आहे.
चॅपल म्हणाले की, “धोनीसोबत मी भारतात काम केले आहे. तो त्या खेळाडूंपैकी एक आहे, ज्यांनी कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय आपले कौशल्य विकसीत केले आहे. धोनी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर जास्त अनुभवी खेळाडूंविरुद्ध खेळला आणि त्याने आपली निर्णयक्षमता आणि कौशल्य विकसित केली. याबाबतीत तो त्याच्या काळातील क्रिकेटपटूंपेक्षा वेगळा आहे. मला भेटलेल्या सर्व क्रिकेटपटूंमध्ये धोनी सर्वात हुशार आहे.”
धोनीने सौरव गांगुली कर्णधार आणि जाॅन राइट प्रशिक्षक असताना खेळण्यास सुरुवात केली. त्यानंतर राहुल द्रविड कर्णधार असताना आणि ग्रेग चॅपलच्या प्रशिक्षकपदाखाली त्याने आपल्या खेळात सुधारणा केली. यादरम्यानच धोनीने श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची खेळी केली. ती त्याची एकदिवसीय सामन्यांतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या ही आहे.
चॅपल यांनी ऍशेस मालिकेत पराभूत झालेल्या इंग्लंडचे उदाहरण दिले. पुढे चॅपल म्हणाले की, “इंग्लंडमधील तरुण खेळाडूंना व्यक्त होण्यासाठी चांगले वातावरण मिळत नाही. इंग्लंडचे खेळाडू सार्वजनिक शाळांच्या हद्दीत राहुन स्वत:ला तयार करत असतात. त्यामुळेच त्यांच्या फलंदाजीमध्ये लवचीकता दिसत आहे.” ऍशेस मालिकेत इंग्लंडला ऑस्ट्रेलियासोबत ४-० ने पराभव स्वीकारावा लागला.
महत्त्वाच्या बातम्या –
खरेदीदार आहे का? ‘हा’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू बिटकॉइनसाठी विकतोय ट्विटर अकाऊंट, वाचा सविस्तर
व्हिडिओ पाहा – पुजाराला त्याचे वडिल एका गोष्टीपासून कायम वाचवत होते