मंगळवारी(१० नोव्हेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२० च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटलचा पराभव करत पाचव्या वेळी जेतेपद जिंकले. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स संघाने पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाचा उपकर्णधार रोहितला मर्यादित षटकांच्या स्वरुपात आता कर्णधार बनवण्याची वेळ आली आहे, असा विश्वास गंभीरने व्यक्त केला आहे.
गंभीर म्हणाला, ‘जर एखादा खेळाडू पाच वेळा आयपीएल चषक जिंकला तर तुम्ही काय म्हणाल ?’ गंभीर म्हणाला की, ‘अर्थातच एक कर्णधार फक्त त्याच्या संघाप्रमाणेच चांगला असतो, यात काही शंका नाही. जर रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला नाही तर ते भारताचे दुर्दैव आहे रोहित शर्माच नाही.’
गंभीर म्हणाला, ‘जर आपण धोनीला भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणतो, तर तो त्याच आधारावर म्हणतो की त्याने दोन विश्वचषक जिंकले आहेत आणि दोन आयपीएल जिंकले आहेत. रोहितने पाच वेळा आयपीएल जिंकली आहे. त्यामुळे जर त्याला कसोटी सामन्याचे कर्णधारपद किंवा टी -20 क्रिकेटचे कर्णधार पुढे न मिळाल्यास ही लज्जास्पद बाब असेल. कारण यापेक्षा आणखी काही रोहित शर्मा करू शकत नाही. तो केवळ कर्णधार म्हणून संघाला जिंकवू शकतो.
क्रिकइंफोशी बोलताना गंभीरने क्रिकेटच्या वेगळ्या प्रकारासाठी वेगळ्या कर्णधारा करण्याबद्दलही मत मांडले. तो म्हणाला लोकांना वाटते की रोहित चूकीच्या काळात समोर आला, ज्या काळात विराट कोहली नेतृत्व करत होता.
गंभीरने त्याची मतं मांडताना म्हटले की ‘आपण वेगवेगळ्या प्रकारासाठी वेगवेगळे कर्णधार करु शकतो. त्यात काही चूकीचे नाही. रोहितने मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सिद्ध केले आहे की त्याच्या आणि विराटच्या नेतृत्वात फरक आहे. एक खेळाडू कर्णधार म्हणून ५ वेळा विजेतेपद जिंकतो आणि दुसरा एकदाही नाही.’
गंभीर पुढे म्हणाला, “विराट कोहली हा वाईट कर्णधार नाही, परंतु विराट आणि रोहितला समान व्यासपीठ मिळाले आहे, जिथे रोहितने स्वत: ला अधिक चांगले सिद्ध केले आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
पिछा ना छोडेंगे! चेन्नईनंतर ‘हा’ मोठा किर्तीमान मिळवणारा मुंबई दुसराच संघ
काय सांगता ! १३ वर्षात ६ आयपीएल विजेतेपदे; रोहित बनला आयपीएलचा बेताज बादशाह
कोई शक ! विरेंद्र सेहवागने केले अनोख्या अंदाजात मुंबई इंडियन्सचे कौतुक