भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जात आहे. दरम्यान त्यातील 2 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये दोन्ही संघांनी 1-1 विजय मिळवला आहे. आता तिसरा कसोटी सामना (14 डिसेंबर) पासून ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. ॲडलेड कसोटीतील पराभवानंतर भारताचे लक्ष नक्कीच पुनरागमनाकडे असेल.
दरम्यान, भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने (Harbhajan Singh) ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाच्या रणनीतीबाबत आपले मत मांडले आहे. हरभजन सिंग म्हणाला की, कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ॲडलेडमध्ये खराब कामगिरी करूनही तिसऱ्या कसोटीत सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत राहील.
हरभजन सिंग (Harbhajan Singh) स्टार स्पोर्ट्शी बोलताना म्हणाला की, “फलंदाजीच्या क्रमात काही बदल होईल असे मला वाटत नाही. संघ व्यवस्थापन असा विचार करेल असे वाटते. रोहित सध्या फारशा फॉर्ममध्ये नाही, मग तुम्ही त्याला फलंदाजी क्रमाने का पाठवाल? मला वाटते केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने सलामी सुरू ठेवली पाहिजे, तर रोहितने मधल्या फळीत फलंदाजी करावी.”
फलंदाजी क्रमवारीत सातत्य राखण्याचा सल्ला देताना हरभजनने भारताच्या गोलंदाजी आक्रमणातील बदलांचा अंदाज वर्तवला. पर्थमध्ये आपल्या अष्टपैलू क्षमतेने छाप पाडणाऱ्या ‘रविचंद्रन अश्विन’च्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) समावेश करण्याची सूचना त्याने केली. तो म्हणाला, “वॉशिंग्टन सुंदर ब्रिस्बेन कसोटीसाठी पुनरागमन करू शकतो, अश्विनने ॲडलेडमध्ये फारशी गोलंदाजी केली नाही. त्याचा फारसा प्रभाव पडला नाही, दुसरीकडे सुंदर बॅटने चांगली कामगिरी करतो. त्याने पर्थमध्ये 2 महत्त्वाच्या विकेट्स देखील घेतल्या, त्याला संधी मिळेल.”
याशिवाय हरभजनने वेगवान गोलंदाजी विभागातही बदल करण्याची मागणी केली. ॲडलेडमध्ये संघर्ष करणाऱ्या हर्षित राणाऐवजी प्रसिद्ध कृष्णाला (Prasidh Krishna) संधी दिली जाऊ शकते, असे तो म्हणाला. माजी क्रिकेटपटू म्हणाला, ब्रिस्बेनच्या उसळत्या खेळपट्टीवर प्रसिध कृष्णा खूप उपयुक्त ठरू शकतो, त्याची लांबी आणि बाऊन्स घेण्याची क्षमता त्याला हर्षित राणाऐवजी मजबूत बनवते.”
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या जर्सीवर नाव लिहिण्यासाठी किती पैसे घेते BCCI?
थेट अंपायरलाच दिल्या शिव्या, आयसीसीने केली मोठी कारवाई!
वनडे क्रमवारीत आफ्रिकन खेळाडूचा जलवा, तर भारतीय खेळाडूंना बसला फटका






