---Advertisement---

“जाता-जाता आणखी एक…”, अनुभवी खेळाडूची विराट-रोहितला विशेष मागणी!

On: रविवार, मार्च 2, 2025 12:34 PM
---Advertisement---

रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघेही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. रोहित शर्मा 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. आता त्याच्यावर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीच्या आव्हानावर मात करून भारताला तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्याची जबाबदारी आहे. माजी भारतीय वेगवान गोलंदाज प्रवीण कुमार यांनी विश्वास व्यक्त केला आहे की रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 12 वर्षांनंतर निश्चितच चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकेल. प्रवीण कुमारने रोहित शर्मासोबत भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्समध्येही खेळले आहे.

भारतीय संघाबद्दल बोलताना प्रवीण कुमार की, “मला विश्वास आहे की रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ निश्चितच विजेतेपद जिंकेल. तो त्याच्या नावावर आणखी एक आयसीसी ट्रॉफी जोडणार आहे. मी फक्त एवढेच म्हणेन की विराट आणि रोहितने निवृत्ती घेण्यापूर्वी आम्हाला आणखी एक आयसीसी ट्रॉफी द्यावी.”

स्पर्धेत भारताने बांग्लादेशचा 6 गडी राखून पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये पहिला विजय मिळवला. त्यानंतर, 23 फेब्रुवारी रोजी भारत-पाकिस्तान मेगा सामना झाला, ज्यामध्ये विराटच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला. सलग दोन विजय मिळवून भारताने उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. परंतु आता टेबल टॉपर होण्यासाठी त्यांना न्यूझीलंडचा सामना करावा लागेल.

प्रवीण कुमारने विराट कोहलीबद्दलही प्रतिक्रिया दिली तो म्हणाला की, “विराट चांगला खेळत आहे, तो एक मोठ्या सामन्याचा मोठा खेळाडू आहे. तो पुन्हा ऑफ-स्टंपच्या बाहेर चेंडूंवर बाद होईल असे प्रश्न उपस्थित केले जात होते. तरीही त्याच्यासाठी ही समस्या आहे का? असे नाही कारण त्याच्यासारख्या खेळाडूला पुनरागमन करण्यासाठी जास्त सामन्यांची आवश्यकता नसते. त्याला फक्त एका चांगल्या खेळीची आवश्यकता होती.”

हेही वाचा-

विराटसाठी 2 मार्च खास, 2008 मध्ये केलेला हा पराक्रम, आजही सामना गाजवणार?
IMLT20: राहुल शर्माची हॅट्ट्रिक, रायुडूचा तडाखा, इंडिया मास्टर्सचा दमदार विजय!
विराट कोहलीच्या ऐतिहासिक ‘ट्रिपल सेंच्युरी’साठी अनुष्का शर्मा आणि परिवार दुबईत दाखल!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---