---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम, पण अबू धाबीत आलंय रैना नावाचं वादळ, गोलंदाजांना झोडपूनच काढलं

On: शनिवार, नोव्हेंबर 26, 2022 9:07 PM
Suresh-Raina
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी फलंदाज सुरेश रैना याने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 15 ऑगस्ट, 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. असे असले, तरीही त्याची धावा काढण्याची भूक अजूनही कमी होत नाहीये. सध्या तो अबू धाबी टी10 लीग स्पर्धेत खेळताना दिसत आहे. त्याला डेक्कन ग्लेडिएटर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील केले आहे. या स्पर्धेचा नववा सामना डेक्कन ग्लेडिएटर्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स संघात खेळला गेला. या सामन्यात रैनाची बॅट चांगलीच तळपली.

रैनाने गाजवली अबू धाबी टी10 लीग
अबू धाबी टी10 लीग (Abu Dhabi T10 League) स्पर्धेचा नववा सामना डेक्कन ग्लेडिएटर्स विरुद्ध न्यूयॉर्क स्ट्रायकर्स (Deccan Gladiators vs New York Strikers) संघात पार पडला. या सामन्यात काट्याची टक्कर पाहायला मिळाली. क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात सुरेश रैना (Suresh Raina) आपल्या फलंदाजीचा दम दाखवताना दिसला. तो फलंदाजीला आला, तेव्हा त्याचा संघ 100 धावसंख्या गाठण्यात संघर्ष करत होता. मात्र, रैना क्रीझवर येताच स्ट्रायकर्स संघाच्या गोलंदाजांचा त्याने घामच काढला. त्याने अवघ्या 19 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 28 धावा चोपल्या. यामुळे त्याच्या संघाला समाधानकारक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला.

https://twitter.com/CricCrazyJohns/status/1596486904157200385

https://twitter.com/Jairam__SR3/status/1596488466292150274

रैना आणि ओडियन स्मिथच्या (38) खेळीच्या जोरावर ग्लेडिएटर्स संघाने 7 विकेट्स गमावत 109 धावा केल्या. हे आव्हान स्ट्रायकर्स संघाने 2 विकेट्स गमावत पार केले. त्यामुळे त्यांनी हा सामना 8 विकेट्सने आपल्या नावावर केला.

पहिल्या सामन्यात झाला होता फ्लॉप
विशेष म्हणजे, आयपीएल 2022च्या मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्यानंतर रैना समालोचन करताना दिसला होता. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या लीगमध्ये भाग घेण्यास सुरू केले आहे. नुकताच तो लीजेंड लीग क्रिकेटमध्येही खेळताना दिसला होता. आता तो अबू धाबी टी10 लीगमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. मात्र, या लीगमध्ये त्याचे पदार्पण काही खास ठरले नव्हते. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तो शून्य धावेवर तंबूत परतला होता. त्याला ऑस्ट्रेलियाच्या एँड्र्यू टायने तंबूत धाडले होते. (former indian cricketer suresh raina inning t10 league know more)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेतून ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते हाकालपट्टी, भारताच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
बीसीसीआयच्या कारवाईचे सत्र सुरूच, आणखी एका महत्वाच्या व्यक्तीची हकालपट्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---