आयपीएल २०२२ नंतर भारतीय क्रिकेट संघाने मोठ्या प्रमाणावर टी२० खेळले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका बरोबरीत सुटल्यानंतर, भारतीय संघाने विदेशात खेळलेल्या तीनही मालिका जिंकल्या आहेत. दरम्यानच्या काळात भारतीय संघात एक नाव सातत्याने दिसते ते म्हणजे अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे. आयपीएलपासून आपला फिनिशर अंदाज दाखवलेल्या कार्तिकचे अनेक जण कौतुक करत आहे. मात्र, एका माजी भारतीय क्रिकेटपटूने त्याच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा बीसीसीआयने ८ ऑगस्ट रोजी केली होती. यात अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकचाही समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात चमकदार कामगिरी करून कार्तिकने भारतीय संघात पुनरागमन केले होते. तेव्हापासून तो सातत्याने संघात आहे. मात्र माजी क्रिकेटपटू अजय जडेजा आशिया चषकातील त्याच्या निवडीवर खूश नाहीत. कार्तिकच्या निवडीविषयी बोलताना ते म्हणाले,
“सध्या कार्तिकने केवळ आक्रमक क्रिकेट खेळायला हवे. जर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापैकी एक जण संघात नसेल तर, कार्तिकनेही संघात असू नये. तो एक उत्कृष्ट समालोचक आहे. हवं तर तो माझ्या बाजूला बसून समालोचनही करू शकतो. मी निवडकर्तो असतो तर त्याला संघात घेतले नसते. तो आधुनिक क्रिकेटसाठी योग्य खेळाडू मला वाटत नाही.”
भारताचे माजी सलामीवीर के श्रीकांत यांनीदेखील जडेजा यांच्याप्रमाणेच काहीसे वक्तव्य केले होते. जेव्हापासून संघात पुनरागमन केले आहेत तेव्हापासून, कार्तिकला शेवटच्या काही षटकांत फलंदाजीची संधी मिळते. अशा स्थितीत तो वेगवान खेळी खेळतो, तर कधी तसाच आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात बाद होतो. कार्तिक आशिया चषकात कशी कामगिरी करतो हे पाहणे रंजक ठरेल. प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचा समावेश मात्र निश्चित दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पंडित महेंद्रसिंग धोनी! सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय थालाचा नवा लूक
आता मेंटर म्हणून दिसणार धोनी? सीएसके नव्हेतर या संघासाठी निभावणार जबाबदारी
आता ‘या’ लीगमध्येही होणार खेळाडूंचा लिलाव; वाचून घ्या काय आहेत ‘ऑक्शन रूल्स’