भारतीय क्रिकेटमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्यामुळे येत्या काळात क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असणार आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच भारताच्या काही माजी खेळाडूंनी बीसीसीआय सचिव जय शाह यांची भेट घेतली आणि त्यांना लीजेंड्स लीग आयोजित करण्याची विनंती केली. आयपीएलप्रमाणे लिजेंड्स लीगचे आयोजन करावे, अशी माजी क्रिकेटपटूची इच्छा आहे.
वास्तविक, सध्या जगभरात अनेक दिग्गज खेळाडूंच्या लीग खेळल्या जात आहेत, त्यापैकी जागतिक चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स, ग्लोबल लीजेंड्स लीग, लिजेंड्स लीग क्रिकेट हे प्रमुख आहेत. सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, सुरेश रैना, हरभजन सिंग, अंबाती रायडू यांच्यासह अनेक भारतीय खेळाडू या लीगमध्ये खेळतात. जगभरातील टी20 च्या वाढत्या लोकप्रियतेचा फायदा घेण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या विविध लीजंड लीगमधील अनियमितता आणि विविध समस्या पाहता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) स्वतःची लीजंड्स खेळाडूंची लीग देखील सुरू करू शकते.
मुथय्या मुरलीधरन, सनथ जयसूर्या, ख्रिस गेल, किरॉन पोलार्ड, एबी डिव्हिलियर्स असे अनेक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही अनेक लीगमध्ये खेळतात. बीसीसीआय सध्या आयपीएल आणि महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) आयोजित करते. या लीगमध्ये शहरांवर आधारित फ्रेंचायझी संघ असावेत आणि जगभरातील खेळाडूंसाठी बोली लावली पाहिजे. बीसीसीआयने या प्रस्तावावर शक्यता तपासण्याचे आश्वासन दिले आहे आणि जर सर्व काही ठीक झाले तर भारतातील प्रेक्षकांनाही माजी महान खेळाडूंमधील लीजेंड्स लीगचा आनंद लुटता येईल.
या संदर्भात बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला या संदर्भात माजी क्रिकेटपटूंकडून प्रस्ताव आला असून, त्यावर विचार केला जात आहे. मात्र, तो अद्याप प्रस्तावाच्या टप्प्यावर आहे.” या वर्षी ही लीग होऊ शकते का असे विचारले असता ते म्हणाला की नाही, इतक्या लवकर ते शक्य नाही. याचा पुढील वर्षी नक्कीच विचार करता येईल. यामध्ये ते खेळाडू खेळतील जे आपल्या देशातून निवृत्त झाले आहेत आणि आयपीएलमध्येही खेळत नाहीत.
हेही वाचा-
‘पॅरिस ऑलिम्पिक’मधील सहभागी खेळाडू 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर, या विषयावर होणार मोंदीशी खास चर्चा
पॅरिसहून नीरज चोप्रा भारताऐवजी अचानक जर्मनीला रवाना; गंभीर प्रकरण समोर
लग्नाविना दुसऱ्यांदा वडील बनणार स्टुअर्ट ब्रॉड, गोंडस फोटो शेअर करत दिली गुड न्यूज