टी20 विश्वचषक 2024 मध्ये भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत बॅटने शानदार कामगिरी करताना दिसत आहे. पंतची कामगिरी पाहून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू रवी शास्त्रीही चांगलाच प्रभावित झाला आहे. नुकतेच आयसीसीशी बोलताना रवी शास्त्री यांनी पंतबाबत मोठे वक्तव्य केले आहे. रिषभ पंत हा टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर का आहे हे शास्त्रींनी सांगितले आहे.
वास्तविक, टीम इंडियाचा स्टार फलंदाज रिषभ पंत डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात गंभीर दुखापती झाला होता, त्यानंतर त्याला क्रिकेटच्या मैदानात परतण्यासाठी 15 महिन्यांचा काळ लागला. पंतने 2024 च्या आयपीएलद्वारे पुनरागमन केले, ज्यामध्ये त्याने चमकदार कामगिरी केली आणि सर्वांची मने जिंकली.आयपीएल 2024 मध्ये बॅटने खळबळ माजवल्यानंतर त्याला टी-20 विश्वचषकात भारतीय संघात स्थान मिळाले आणि तो आपल्या फलंदाजी आणि यष्टिरक्षणाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दरम्यान, आयसीसीशी बोलताना रवी शास्त्री यांनी रिषभ पंतचे कौतुक केले आणि तो टीम इंडियासाठी एक्स फॅक्टर का आहे हे सांगितले.
शास्त्री म्हणाले की, आम्हाला माहित आहे की जेव्हाही त्याला संधी मिळते तेव्हा तो संधीचा फायदा घेताना दिसतो. तो मैदानावर धोकादायक फटके मारताना दिसत आहे. तो भारतासाठी एक्स फॅक्टर आहे. माझ्यासाठी सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याचे यष्टीमागे अप्रतिम किपिंग. अपघातानंतर तो ज्या पद्धतीने सावरला आणि मैदानात परतला तो खरोखरच कौतूकास पात्र आहे. तो ज्याप्रकारे मैदानावर शानदार क्षेत्ररक्षण करतो आणि झेल घेतो त्यामुळे मी खूप प्रभावित झालो आहे. मला वाटते की तो केवळ बॅटनेच नाही तर तो अप्रतिम कामगिरी करत आहे, पण यामध्ये सातत्य राखण्यातही तो उत्तम आहे.
महत्तवाच्या बातम्या-
क्रिकेट जगतासाठी धक्कादायक बातमी; टीम इंडियाच्या या खेळाडूने केली आत्महत्या
‘या’ खेळाडूला मिळणार संधी; मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सांगितला गेम प्लॅन
हे 4 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील; सुपर-8 फेरी दरम्यान डेल स्टेनची आश्चर्यकारक भाविष्यवाणी समोर