पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे (Champions Trophy 2025) आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत यजमान पाकिस्तानसह आठ संघ सहभागी होतील. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानात जाणार का? याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. असे असतानाच आता भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याचे एक वक्तव्य समोर येत आहे.
आयसीसीच्या कार्यक्रमानुसार 2025 मध्ये पाकिस्तानात चॅम्पियन ट्रॉफी होईल. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हायब्रीड मॉडेलची मागणी करू शकते. यामध्ये भारत आपले सामने श्रीलंका अथवा दुबई येथे खेळण्याबाबत विचारणा करण्याची शक्यता आहे. मात्र, याला पाकिस्तान क्रिकेट बोर्ड परवानगी देईल का? असा प्रश्न निर्माण होतोय.
यात संपूर्ण पार्श्वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तो भारतीय खेळाडू सुरक्षेच्या कारणामुळे पाकिस्तानात येणार नाहीत असे म्हणतोय. त्याच्या म्हणण्यानुसार, “भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी येणार नाही. आमच्या खेळाडूंना सुरक्षेची चिंता आहे. तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा नाहीतर खेळू नका. पाकिस्तान विनाही भारतीय क्रिकेट चालू शकते.”
भारतीय संघाने अखेरच्या वेळी 2008 मध्ये पाकिस्तानात क्रिकेट खेळले होते. त्यावेळी भारतीय संघ आशिया चषक खेळण्यासाठी केलेला. पुढे 2009 मध्ये श्रीलंका संघावर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक वर्ष पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट झाले नव्हते. मात्र, मागील काही वर्षांपासून भारत वगळता इतर सर्व संघ पाकिस्तान दौऱ्यावर जातात. यंदा पाकिस्तान चॅम्पियन ट्रॉफी आयोजित करत असताना इतर संघांनी पाकिस्तानमध्ये खेळण्यास होकार दिला आहे.
भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तरी ही स्पर्धा होईल, अशी भूमिका पाकिस्तानने घेतल्याचे समजते. त्यांनी याबाबत अधिकृत वक्तव्य केले नसले तरी, श्रीलंका संघाला समाविष्ट करत ही स्पर्धा आयोजित करण्याचा त्यांचा मनोदय आहे. तसेच, भारतीय संघ पाकिस्तानमध्ये आला नाही तर, 2026 टी20 विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याची धमकी पीसीबी देत असल्याचे सांगण्यात येतेय.
महत्वाच्या बातम्या-
श्रीलंका दौऱ्यापासून होणार गौतम गंभीरच्या नव्या युगाची सुरुवात
आयपीएलमध्ये आक्रमक फटकेबाजी करणाऱ्या ‘या’ खेळाडूला कांगारुंनी दिलं संघात स्थान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी! “भारत चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी आला नाही तर…”