केरळ रणजी संघाचे माजी कर्णधार ओके रामदास यांचे बुधवारी (१३ जुलै) निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. दोन आठवड्यांपूर्वी त्यांना ह्रदयविकाराचा पहिला झटका आला होता, तेव्हापासून त्यांची तब्यत खालावली होती. त्यानंतर श्री चिथिरा आयुर्विज्ञान संस्थान, याठिकाणी उपचारासाठी त्यांना भर्ती करण्यात आले होते. पण बुधवारी अचानक त्यांना पुन्हा एक ह्रदयविकाराचा झटका आला, ज्यामध्ये त्यांची प्राणजोत मावळली.
श्री चिथिरा आयुर्विज्ञान संस्थानात उपचार सुरू असताना त्यांच्या तब्यतीत सुधारणा पाहिली गेली होती, पण बुधवारी (१३ जुलै) अचानक झटका आल्यानंतर त्यांचे निधन झाले. ओके रामदास (OK Ramdas) यांनी सर्वप्रथम कन्नूर क्रिकेट क्लबसाठी सलामीवीर फलंदाजाच्या रूपात स्वतःची गुणवत्ता वाढवली. त्यांनी १९६९ ते १९८१ यादरम्यानच्या काळात ३५ रणजी सामन्यांमध्ये केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले. या सामन्यांमध्ये रामदास यांच्या बॅटमधून २४.०५ च्या सरासरीने १६४७ धावा केल्या. यामध्ये त्यांच्या ११ अर्धशतकांचाही समावेश होता.
रामदास स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोरच्या क्रिकेट संघाचेही नेतृत्व केले आहे. १९७९ मध्ये त्यांनी तामिळनाडूविरुद्धच्या एका रणजी ट्रॉफी सामन्यात केरळ संघाचे नेतृत्व केले होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर केरळ क्रिकेट असोसिएशनच्या निवडकर्त्यांच्या रूपातही त्यांनी काम केले. तसेच बीसीसीआयसाठी (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) मॅच रेफरीचीही भूमिका त्यांनी पार पाडली आहे. ओके रामदास यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी त्यांना एक स्टायलिश सलामीवीर फलंदाज, असे म्हटले आहे.
केरळ रणजी संघाचे प्रशिक्षक आणि माजी कर्णधार पी बालचंद्रन यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. बालचंद्रन म्हणाले की, रामदार एक स्टायलिश सलामीवीर फलंदाज होते, ज्यांनी नवीन चेंडूसह खरोखर चांगले प्रदर्शन केले होते. ते १९७८ मध्ये माझ्या पदार्पणावेळी आमचे मेंटॉर होते. तेव्हा केरळ संघाकडे रामदास आणि सुवी गोपालकृष्णन यांची चांगली जोडी होती, जी कोणत्याही गोलंदाजी आक्रमाविरुद्ध एक मजबूत जोडी होती.
रामदास यांच्या कुटुंबावत त्यांच्या मागे आता पत्नी शोभा आणि मुलगा कपिल आहेत. निधनानंतर त्यांचे पार्थिव शरीर त्यांच्या घरी कन्नूर जिल्ह्यात नेले जाईल. गुरुवारी पार्थिवावर अंतिम संस्कार केला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
ENGvsIND: इंग्लंडला हरवणे सोपे नाही, वनडेतील कामगिरी पाहुन तुम्हीही असेच म्हणाल