भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. पहिल्या सामन्यात भारतीय संघाकडे विजयासाठी अनुकूल परिस्थिती होती, पण तरीदेखील न्यूझीलंडने हा सामना अनिर्णीत केला. न्यूझीलंडचे तळातील फलंदाज एजाज पटेल (१८ धावा) आणि रचिन रवींद्र (२ धावा) हे शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहिले आणि सामना अनिर्णीत केला. भारताच्या हातातून हा विजय निसटल्यामुळे चाहते खूपच निराश झाले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर चाहत्यांची निराशा थोडी कमी करण्यासाठी वसीम जाफर यांनी त्यांच्या खास शैलीत काही मजेशीर मीम शेअर केले आहेत.
भारतीय संघाचे माजी सलामीवीर फलंदाज वसीम जाफर मागच्या मोठ्या काळापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आले आहेत. जाफर त्यांच्या मजेशीर मिम्ससाठी प्रसिद्ध आहेत आणि त्यांची सोशल मीडियावरील लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. जाफर यावेळी त्यांच्या अधिकृत कू खात्यावरून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सामन्याविषयी व्यक्त झाले आहेत.
यावेळी जाफरने १९९० च्या शतकातील हिंदी चित्रपट ‘अंदाज अपना अपना’मधील अमिर खान आणि सलमान खान यांच्या एकत्र फोटोसह एक मजेशीर मिम शेअर केले आहे.
त्याव्यतिरिक्त जाफरने एक चार ओळींची दुसरी पोट्स देखील शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने भारताची शेवटच्या दिवशीची अवस्था दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जाफरने या पोस्टमध्ये लिहिले की, “आज जर तुम्ही दुपारच्या जेवणापर्यंत उशीर केला. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेग घेतला आणि चहापानानंतर बरिचशी कामे करण्याचा प्रयत्न केला, पण मर्यादित वेळेपासून काही क्षणांनी चुकलात, तर तुम्ही भारतीय संघाप्रमाणे आहात.” जाफरने या पोस्टसह एक स्माईलीचा इमोजी देखील दिला आहे.
दरम्यान, जाफरने केलेल्या पोस्टप्रमाणे भारतीय संघाने शेवटच्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये एकही विकेट घेतला नाही आणि नंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रामध्ये मात्र भारतीय गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन करून पुनरागमन केले. असे असले तरी, भारताला शेवटचा एक विकेट घेता आला नाही आणि सामना अनिर्णीत राहिला. या सामन्यात भारतासाठी पदार्पण करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. त्याने पहिल्या डावात १०५ आणि दुसऱ्या डावात ६५ धावांची महत्वाची खेळी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-न्यूझीलंड कसोटी ड्रॉ झाल्याने किवी कर्णधार खुश, ‘या’ खेळाडूंचे केले तोंडभरून कौतुक
मुंबई कसोटीत विराट कोणाच्या जागेवर खेळणार? अजिंक्य रहाणे म्हणतोय…






