Zaheer Khan On T20 World Cup 2024: विश्वचषक 2023 स्पर्धेत भारतीय संघाचे 12 वर्षांनी विश्वचषक विजेता बनण्याचे स्वप्न भंगले. असे असले, तरीही विश्वचषकातील पराभव विसरून आता भारतीय संघ आगामी टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेच्या तयारीला लागला आहे. मागील काही टी20 मालिकांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा भारतीय संघाचा भाग नाहीयेत. तसेच, कर्णधारपद हार्दिक पंड्या याच्याकडे सोपवण्यात आले आहे. असे म्हटले जात आहे की, टी20 विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व पंड्याच सांभाळू शकतो. मात्र, भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान पंड्याला विश्वचषकात कर्णधार बनवण्याच्या बाजूने नाहीये.
कोणी करावे संघाचे नेतृत्व?
झहीर खान (Zaheer Khan) याच्या मते, टी20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) स्पर्धेत भारतीय (Team India) संघाचे नेतृत्व रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सांभाळले पाहिजे. क्रिकबझ या क्रिकेट वेबसाईटशी बोलताना झहीर म्हणाला, “रोहित तो व्यक्ती आहे, जो सध्या संघाच्या खूपच जवळ आहे. तो परिस्थिती आणि दबाव कसा हाताळायचा, हे जाणतो. तुमच्याकडे या नावांवर विचार करण्यासाठी पुढे खूप वेळ आहे.”
पुढे बोलताना झहीर म्हणाला की, “टी20 विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी जवळपास 6 महिन्यांचा कालावधी आहे. अशातच आयपीएलसारखी मोठी स्पर्धाही होणार आहे, जी तयारी पक्की करण्यात मदत करेल. अशात माझ्या मते, कर्णधार रोहित शर्मा असला पाहिजे किंवा मग हे हार्दिकच्या रिहॅब आणि त्याच्या पुनरागमनावरही अवलंबून असेल. आव्हान हे आहे की, हार्दिकला जास्त सामने खेळण्याची संधी मिळणार नाही.”
पंड्याचे नेतृत्व
हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात फक्त 6 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या सहा सामन्यांपैकी 5 सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. तसेच, एक सामना बरोबरीत सुटला आहे. म्हणजेच टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार पंड्याने एकही सामना गमावला नाहीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंड्याने एकूण 11 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. यातील 8 सामन्यात त्याला विजय मिळवण्यात यश आला आहे, तर 2 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. (former pacer zaheer khan on t20 world cup 2024 team india captaincy said this read here)
हेही वाचा-
अर्रर्र! बुमराहच्या Insta Storyने माजवली खळबळ, मुंबईला केलं अनफॉलो; RCB संघात जाणार का? चाहतेही गोंधळात
भारताकडून सलग 2 सामने हारताच ऑस्ट्रेलिया संघात 6 धक्कादायक बदल, मॅक्सवेलसह ‘हे’ वर्ल्डकप स्टार परतणार मायदेशी