ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतामध्ये आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेचे आयोजन होणार आहे. या स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर संपूर्ण जगाच्या नजरा आहेत. मात्र, या सामन्याच्या आयोजनाला अद्याप बराच वेळ आहे, पण पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी आता गरळ ओकण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज राणा नावेद उल हसन याने खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्याच्या वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
काय म्हणाला राणा?
खरं तर, राणा नावेद उल हसन (Rana Naved Ul Hasan) याने एका पॉडकास्टमध्ये विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेविषयी भाष्य केले. तो म्हणाला की, विश्वचषकात भारतातील मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील. या वक्तव्यामुळे आता राणा भारतीय चाहत्यांच्या निशाण्यावर आला आहे.
पाकिस्तानसाठी 9 कसोटी, 74 वनडे आणि 4 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा राणा म्हणाला की, “भारतीय संघ जेव्हाही त्यांच्या मायदेशात खेळतो, तेव्हा नक्कीच ते प्रबळ दावेदार असतील. पाकिस्तान संघही चांगला आहे. मला वाटते की, विश्वचषकात चांगले सामने होतील. प्रेक्षकांबद्दल बोलायचं झालं, तर मला वाटते की, तिथेही मुस्लिम लोक जास्त आहेत. आम्हाला त्यांचाही पाठिंबा मिळेल. भारतीय मुस्लिमही आम्हाला पाठिंबा देतात. मी तिथे दोन मालिका खेळलो आहे आणि आम्हाला चांगला पाठिंबा मिळाला होता.”
आशिया चषकात होणार आमना-सामना
भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ लवकरच आशिया चषक 2023 स्पर्धेत भिडताना दिसतील. पाकिस्तान संघ यजमान असलेल्या आशिया चषकाची सुरुवात 31 ऑगस्टपासून होणार आहे. यामधील 4 सामने पाकिस्तानमध्ये, तर उर्वरित 9 सामने श्रीलंकेत खेळले जाणार आहेत. ही मोठी स्पर्धा हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळली जाईल. भारताने आधीच पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल.
विश्वचषकात कधी भिडणार?
आशिया चषकानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान संघ 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भिडतील. पाकिस्तान संघ आधी अहमदाबादमध्ये खेळण्यास तयार नव्हता. मात्र, बीसीसीआय आणि आयसीसीपुढे त्यांना शरणागती पत्करावी लागली. शेवटी भारत विरुद्ध पाकिस्तान संघाच्या यजमानपदाची जबाबदारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमलाच मिळाली. या सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी खूपच उत्सुक आहेत. (former pak cricketer shocking statement said indian muslims will support pakistan in 2023 world cup)
महत्वाच्या बातम्या-
कसोटी विजयानंतर रोहितला अनारकलीचा फोन; नेटकरी म्हणाले, ‘आता वडापावही…’
पाकिस्तानची पुन्हा एकदा कुरापत! आशिया कपआधी केली नवीन मागणी