पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आशिया चषक 2023 स्पर्धेत आमने-सामने येत आहेत. उभय संघात रविवारी (दि. 10 सप्टेंबर) सुपर- 4 फेरीतील तिसरा सामना खेळला जाणार आहे. हा सामना कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर श्रीलंकेत पोहोचला आहे. यादरम्यानचा व्हिडिओही त्याने शेअर केला आहे. त्याने व्हिडिओद्वारे भारतीय संघाला चेतावण दिली आहे.
‘रावळपिंडी एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जाणारा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर अनेक वर्षांनंतर भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी कोलंबो येथे पोहोचला आहे. अख्तरने त्याच्या ट्विटर (एक्स) अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. अख्तरचा हा व्हिडिओ विमानतळावरून बाहेर जातानाचा आहे. यामध्ये तो बोलताना दिसत आहे.
काय म्हणाला अख्तर?
शोएब अख्तर म्हणाला की, “किती वर्षांनंतर कोलंबोला आलो आहे, परमेश्वरालाच माहिती. मात्र, इथे परत येऊन खूपच चांगले वाटत आहे. महान देश आणि येथील लोकही खूप चांगले आहेत. तसेच, हवामानही ठीक दिसत आहे. पाकिस्तानपासून सावध राहा.”
व्हिडिओ व्हायरल
अख्तरचा हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमींनी या व्हिडिओवर आपली मते मांडली आहेत. एका युजरने लिहिले की, “आम्ही सावधच राहतो पाकिस्तानपासून, उधार मागायला नको.”
हम बचके ही रहते है पाकिस्तान से .. कही उधारी न मांग ले ????
— Ashok Rajpurohit (@ashok_apna_AK) September 9, 2023
खरं तर, आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत-पाकिस्तान (India-Pakistan) सामना खेळला गेला होता. मात्र, हा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.
अशातच आता पुन्हा एकदा हे संघ आमने-सामने असणार आहेत. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडिअमवर होत असलेल्या या सामन्यात पावसाची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी आशियाई क्रिकेट परिषदेनेही या सामन्यासाठी 11 सप्टेंबर हा राखीव दिवस ठेवला आहे. मात्र, त्या दिवशीही पावसाने व्यत्यय आणला, तर दोन्ही संघाला प्रत्येकी 1 गुण दिला जाईल. (former pak pacer shoaib akhtar reached colombo before india vs pakistan odi asia cup 2023)
हेही वाचाच-
श्रीलंकेच्या विजयामुळे ‘या’ संघाचा पत्ता कट! पाहा Asia Cup 2023चा लेटेस्ट Points Table
Asia Cup 2023: कोलंबोत पाकिस्तान भारताच्याही पुढे, असं आम्ही नाही, तर ‘ही’ आकडेवारी सांगतेय; पाहा






