---Advertisement---

“रिषभ असाच खेळत राहिला तर तो धोनी, गिलख्रिस्टला नक्की मागे टाकेल”, पाकिस्तानी दिग्गजाची उधळली स्तुतीसुमने

On: रविवार, मार्च 28, 2021 5:05 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा गेल्या काही सामन्यांपासून भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर उत्कृष्ट कामगिरी केल्या नंतर त्याने इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकांमध्ये देखील मोलाची कामगिरी केली आहे. अशातच माजी पाकिस्तानी कर्णधाराने रिषभ पंतवर स्तुतीसुमने उधळत मोठे वक्तव्य केले आहे.

इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात रिषभ पंतला संघात संधी देण्यात आली होती. या संधीचा लाभ घेत त्याने अवघ्या ४० चेंडूत ७७ धावांची खेळी केली होती. या खेळी नंतर सर्वत्रच त्याचे कौतुक केले जात होते. अशातच माजी पाकिस्तानी कर्णधार इंजमाम उल हक याने रिषभ पंतचे कौतुक करत तो धोनी आणि गिलख्रिस्टला ही मागे टाकू शकतो, असे म्हटले आहे.

धोनी आणि गिलख्रिस्टला सोडू शकतो मागे

इंजमाम उल हक म्हणाले, “तो ज्याप्रकारे स्वतःला व्यक्त करतो आणि त्याच्याकडे ज्या प्रकारचे शॉट्स आहेत, असे मी गेल्या ३०,३५ वर्षात दोनच यष्टीरक्षक फलंदाज पाहिले आहेत. एमएस धोनी आणि एडम गिलख्रिस्ट, हे दोन असे यष्टीरक्षक होते जे सामना बदलून टाकायचे. रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो धोनी आणि गिलक्रिस्टला नक्की मागे टाकेल.”

रिषभ पंतने इंग्लंड विरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात अवघ्या ४० चेंडूत ७७ धावांची खेळी केली होती. या खेळी बाबत बोलताना इंजमाम उल हक म्हणाला, “ज्याने भारतीय संघाच्या लोवर ऑर्डरमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे तो रिषभ पंतच आहे. त्याने ४० चेंडूत ७७ धावांची खेळी खेळली होती. त्यामुळेच भारतीय संघाच्या धावांच्या गतीत वाढ झाली होती. मी त्याला गेल्या ६ -७ महिन्यांपासून फॉलो करत आहे. ज्याप्रकारे तो वेगवेगळ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करत आहे, ते अप्रतिम आहे.”

रिषभने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत देखील आक्रमक फटकेबाजी करताना ६२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ७८ धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या –

नादच खुळा! इंग्लिश गोलंदाजाच्या चेंडूवर रिषभचा एका हाताने सिक्सर, पाहा झक्कास व्हिडिओ

रोड सेफ्टी सिरीजमधील सचिनचा तिसरा संघसहकारी कोरोना पॉझिटीव्ह, फायनलमध्ये केल्या होत्या ७ धावा

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भावांना खेळताना पाहिले अन् प्रभावित होऊन पुढे ‘तो’ झाला इंग्लंडचा कर्णधार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---