जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांमध्ये गणले जाणारे बोर्ड म्हणजे, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ होय. याच बीसीसीआयविषयी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीचे माजी अध्यक्ष एहसान मनी यांनी मोठा दावा केला आहे. त्यांनी बीसीसीआयचा संबंध थेट राजकीय पक्षाशी जोडला आहे.
एहसान मनी (Ehsan Mani) म्हणाले की, बीसीसीआयमध्ये (BCCI) भारतीय जनता पक्षाचा (Bharatiya Janata Party) प्रभाव आहे. त्यामुळेच भारत आणि पाकिस्तानच्या (India vs Pakistan) क्रिकेटविषयी चर्चा होत नाही. एहसान यांनी काही काळापूर्वीच पीसीबीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
पाकिस्तान क्रिकेटला दिलेल्या मुलाखतीत एहसान मनी म्हणाले की, “बीसीसीआयकडे सौरव गांगुली असूनही, त्यांच्या बोर्डाचा सचिव कोण आहे, असा प्रश्न कधी कुणाला पडला आहे का? अमित शहा यांचा मुलगा जय शाह. बीसीसीआयचे खजिनदार (अरुण धुमाळ) हे भाजपच्या एका मंत्र्याचे भाऊ आहेत. खरे नियंत्रण त्याच्याकडे आहे आणि भाजप बीसीसीआयला सूचना देते, म्हणून मी त्याच्याशी तडजोड केली नाही किंवा बोललो नाही.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जाण्याबद्दल बोलताना एहसान म्हणाले, “मी पीसीबीचा अध्यक्ष असताना आम्ही कायद्यात सुधारणा केली होती की, अध्यक्षांच्या कामगिरीवर शंका असल्यास संरक्षक थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत. फक्त बोर्डाला अधिकार आहेत. त्याबद्दल काहीतरी करा. आठपैकी फक्त दोन सदस्यांची शिफारस करण्याचा अधिकार संरक्षकांना आहे आणि त्यांना पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करायची आहे हे मंडळावर अवलंबून आहे.”
पीसीबीचे सध्याचे अध्यक्ष रमीज राजा हेदेखील भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट होण्याबाबत चर्चा करत असतात. नुकतेच त्यांनी आयसीसीला प्रस्ताव पाठवला होता. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात टी२० स्पर्धा घेण्याबाबत बोलणी केली होते. मात्र, तरीही आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळला होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
वॉर्नरची आयपीएलमधील ‘या’ विक्रमात विराट, शिखरशी बरोबरी, आता केवळ रैना आहे पुढे
आयपीएल २०२२ मध्ये ५८ सामन्यांत झालीये ८०० पेक्षाही जास्त षटकारांची बरसात, ‘हा’ संघ अव्वलस्थानी
आयपीएल २०२२ संपताच ‘हा’ दिग्गज सोडणार केकेआरची साथ, ज्याने पहिल्याच सामन्याला बनवलेले अविस्मरणीय






