पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टिका करण्याबद्दल शाहिद आफ्रिदीवर निशाना साधला आहे. काही दिवसांपूर्वी शाहिद आफ्रिदीने मोदींबद्दल आणि काश्मीर प्रकरणाबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. त्याबद्दल त्याला अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी खडसावले देखील होते.
कनेरियाने इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की ‘आफ्रिदीने भारताच्या पंतप्रधानांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करायला नको होते. अगदी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खाननेही कधी भारताबद्दल असे उन्मत्तपणे भाष्य केले नाही आणि ते भविष्यातही असे करणार नाहीत. आफ्रिदीने त्यांच्याकडून शिकण्याची गरज आहे आणि त्याला बोलताना मर्यादा असावी, हे देखील माहित पाहिजे.’
तसेच ६१ कसोटी सामन्यात २६१ विकेट्स घेणारा कनेरिया पुढे म्हणाला, ‘कोणत्याही प्रकरणाबद्दल बोलताना आफ्रिदीने आधी विचार करायला पाहिजे. जर त्याला राजकारणात जायचे असेल तर त्याने क्रिकेट सोडले पाहिजे. तूम्ही क्रिकेटमध्ये राहून राजकीय विषयांवर बोलू शकत नाही. त्याच्या प्रतिक्रियांमुळे पाकिस्तान क्रिकेटची प्रतिमा भारतासमोर आणि पूर्ण जगासमोर नकारात्मक बनते.’
तसेच काही दिवसांपूर्वी आफ्रिदीच्या कोरोना व्हायरसच्या परिस्थितीत पाकिस्तानात दान करण्याच्या निर्णयाला भारताच्या हरभजन सिंग आणि युवराज सिंगने पाठिंबा दिला होता. मात्र जेव्हा आफ्रिदीने मोदींबद्दल आणि काश्मीरबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले तेव्हा मात्र हरभजन आणि युवराजने आफ्रिदीला खडसावले देखील होते.
याबद्दल आफ्रिदीवर टिका करताना कनेरिया म्हणाला, ‘पहिल्यांदा तुम्ही त्यांची मदत मागता आणि नंतर त्यांच्याच पंतप्रधानांबद्दल टिकात्मक वक्तव्य करता, हे योग्य नाही. कोणत्या प्रकारच्या मैत्रीची तूम्ही अपेक्षा करत आहात?’
याबरोबर कनेरियाने असेही म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान संघात द्विपक्षिय मालिका व्हायला पाहिजे आणि दोन्ही सरकारांनी समस्या सोडवल्या पाहिजेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
जॉन्टी ऱ्होड्स म्हणतो, तो खेळाडू ना तूमच्यासारखा ना माझ्यासारखा तो वेगळाच क्षेत्ररक्षक
महान क्रिकेटर म्हणतोय, विराट- रोहितपैकी ‘हा’ खेळाडू करणार टी२०मध्ये द्विशतक
वनडे कारकिर्दीत १० पेक्षा जास्त वेळा शून्यावर बाद झालेले भारतीय क्रिकेटपटू, अव्वल क्रमांकावर आहे…