fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

‘सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी जर क्रिकेटर आढळला कोरोना पॉझिटिव्ह, तर…’

Rahul Dravid raised Question of Bio Secure Environment for starting Cricket again

नवी दिल्ली । भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि ‘द वॉल’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडने कोरोना व्हायरसदरम्यानच्या क्रिकेटवर आपले मत स्पष्ट केले आहे. तसेच प्रश्नदेखील उपस्थित केले आहेत. त्याला असे वाटते की, असुरक्षित वातावरणात क्रिकेट पुन्हा सुरू करण्याची महत्वाकांक्षा ही ‘अवास्तविक’ आहे, जी मुख्यत्वे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आखलेली आहे.

कोविड-१९ (Covid-19) या व्हायरसमुळे अनेक आठवड्यांनंतर आपले क्रिकेट सत्र सरु करण्याची मागणी करत ईसीबीने नुकतीच एक घोषणा केली होती. ती अशी की, उन्हाळ्यात पाकिस्तान (Pakistan) आणि वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध होणाऱ्या सामन्यांसाठी सुरक्षित ठिकाणांचा वापर केला जाईल.

ईसीबीच्या संकल्पनेवर द्रविड नाही समाधानी-

“ईसीबीच्या स्तरावर गोष्टी होणे थोडे अवास्तविक आहे. खरंतर ईसीबी (England and Wales Cricket Board) या मालिकेचे आयोजन करण्यासाठी खूप उत्सुक आहे. कारण त्यांच्याकडे इतर कोणतेही क्रिकेट नाही,” असे एका नॉन- प्रॉफिट संस्थेने युवांच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या एका वेबिनारदरम्यान द्रविडने (Rahul Dravid)  म्हटले.

“जरी त्यांनी या मालिकेचे आयोजन केले, तरीही मला असे वाटते की हे प्रत्येकासाठी शक्य होणार नाही. आमच्याकडे वेळापत्रक आहे. त्यानुसार प्रवास करणे आणि इतक्या साऱ्या लोकांमध्ये हा दौरा करणे हे आणखी कठीण आहे,” असेही तो पुढे म्हणाला.

जैव- सुरक्षित वातावरणात क्रिकेट सुरु करण्यावर भर-

केवळ ईसीबीच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेनेही (South Africa) हा सल्ला दिला आहे की, भारताने निर्धारित केलेला दौरा जैव- सुरक्षित वातावरणात आयोजित केला जाऊ शकतो.

“आम्हा सर्वांना अपेक्षा आहे की, वेळेबरोबरच परिस्थितीत बदल होईल आणि चांगली औषधे मिळतील. जर तुम्ही सर्वांनी चाचणी केली, क्वारंटाईननंतर कसोटी सामन्यांचे आयोजन केले आणि तरीही जर दुसऱ्या दिवशी एखादा खेळाडू कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळला तर काय होईल? नियम तर हेच सांगतात की, सार्वजनिक आरोग्य विभाग प्रत्येकाला क्वारंटाईनमध्येच तपासेल,” असे द्रविड यावेळी म्हणाला.

राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख द्रविड म्हणाला की, “आम्ही आरोग्य विभाग आणि सरकारच्या अधिकाऱ्यांबरोबर काम करत आहोत. जेणेकरून एखाद्या खेळाडूची पॉझिटिव्ह चाचणी केल्यानंतरही पूर्ण स्पर्धा रद्द होणार नाही.”

बंद दारांमागे खेळल्याने फरक पडेल-

व्यावसायिक स्तरावर, खेळाडू समायोजित करतील आणि यामुळे त्यांच्या कामगिरीवर जास्त परिणाम होऊ देणार नाहीत. जेव्हा एखादा व्यावसायिक खेळाडू मैदानावर पाऊल ठेवतो, तेव्हा त्याचा स्वत: वर खूप अभिमान असतो,” असे द्रविड खेळाडूंबद्दल बोलताना म्हणाला.

“जेव्हा खेळाडू बंद दारामागे खेळतील, तेव्हा त्यांना प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये खेळण्याचा अनुभव नक्कीच आठवेल. जेव्हा तुम्ही एका मोठ्या समूहासमोर खेळता, तेव्हा तुम्हाला वैयक्तिक समाधान मिळत असते,” असेही द्रविड यावेळी म्हणाला.

ट्रेंडिंग घडामोडी-

-महान क्रिकेटर म्हणतोय, विराट- रोहितपैकी ‘हा’ खेळाडू करणार टी२०मध्ये द्विशतक

-टीकटॉक स्टार झालेल्या चहलला टीकटॉक चाहत्यांनीच केले ट्रोल

-…तर गोलंदाजांना मास्क लावून खेळवावे

You might also like