---Advertisement---

‘या’ दिग्गज खेळाडूचा पाकिस्तानला घरचा आहेर; म्हणाला, ‘पाकिस्तानमध्ये एवढा दम..’

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 5:29 PM
Former Pakistani Spinner criticized PCB
---Advertisement---

मागील काही दिवसापासून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा आपल्याच वक्तव्यामुळे अडचणीत आले आहेत. भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात न जाण्याच्या निर्णयावर बीसीसीआयला राजांनी धमकी दिली होती. रमीझ राजा म्हणालेे होते की जर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये खेळायला आला नाही तर पाकिस्तान संघ देखील विश्वचषक खेळण्यास जाणार नाही. असे असले तरी, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाना साधत घरचा आहेर दिला आहे. 

पाकिस्तान संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरीया (Danish Kaneria) आपली प्रतिक्रिया देत म्हणाला की, ” पाकिस्तान क्रिकेट बोर्डात इतकी हिम्मत नाही की ते आयसीसी स्पर्धेचा बहिष्कार करु शकतील. दुसऱ्या बाजुला भारताला या गोष्टींचा फरक नाही पडत की पाकिस्तान त्यांच्या देशात खेळायला जाणार की नाही. त्यांच्याकडेे पैसा कमवण्यासाठी खुप मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. जर पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात गेला नाही, तर त्याचा तोटा पाकिस्तानलाच होईल.”

यापुढे तो म्हटला की, “पाकिस्तान संघ शेवटी विश्वचषक खेळण्यासाठी भारतात जाईल. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी म्हणतील की आयसीसीच्या दबावामुळे जावे लागेल आणि दुसरा पर्याय नाही. जर पाकिस्तानने वेळोवेळी आयसीसी स्पर्धा न खेळण्याच्या गोष्टी केल्या तर त्यांच्यावर याचा खूप वाईट परिणाम बघायला मिळू शकतो.”

बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह (Jai Shah) यांंनी आधीच स्पष्ट केले होते की भारतीय संघ पाकिस्तानमध्ये कोणतीही स्पर्धा खेळण्यासाठी जाणार नाही. या स्पर्धा पाकिस्तानच्या बाहेर खेळवण्याचा विचार केला जाईल. कनेरीया यावर म्हटला की, “आशिया चषकासाठी अजुन वेळ आहे. तोपर्यंत या दोन्ही देशातील सर्व गोष्टी ठीक होतील की नाही हे सांगता येणार नाही. त्यावेळी परिस्थिती कशी असेल हे देखील माहिती नाही. भारताबरोबरच बांगलादेश आणि अफगणिस्तान देखील आशिया चषक न खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही.”

भारत आणि पाकिस्तान या दोन देशातील संबंध सर्व जगाला माहिती आहेत. पाकिस्तानमध्ये 2009मध्ये श्रीलंकेच्या संघावर दहशतवादी हल्ला झाला होता. तेव्हापासून पाकिस्तानमध्ये कोणत्याही देशाने दौरा केला नव्हता. मात्र, टी20 विश्वचषकाच्या आधी इंग्लंडने पाकिस्तानचा दौरा केला होता.(Former Pakistani Spinner Danish Kaneria criticized that PCB is coward and they are going to participate in World Cup 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना रद्द झाल्यानंतर कॅप्टन धवनची संजूबाबत सारवा-सारव! संघात न घेतल्याचे दिले स्पष्टीकरण
कमिन्सच्या ‘त्या’ निर्णयाला ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे समर्थन; म्हणाला, “त्याने योग्यच केले”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---