---Advertisement---

संजू सॅमसन नव्हे तर ‘या’ यष्टीरक्षकाने श्रीलंकाविरुद्ध करावे यष्टीरक्षण, माजी खेळाडूची इच्छा

On: शुक्रवार, जुलै 9, 2021 8:25 AM
---Advertisement---

भारताचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेला आहे. कर्णधार विराट कोहलीचा अनुपस्थितीमध्ये या भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन करणार आहे. अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीमध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिका खेळणार आहे, ज्यामध्ये युवा खेळाडूंना आपली कामगिरी दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्याचबरोबर या मालिक दरम्यान अनेक खेळाडूंना पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संघासाठी पदार्पण करण्याचीही संधी मिळणार आहे.

श्रीलंका-भारत मालिकेसाठी भारतीय संघाने दोन यष्टिरक्षक फलंदाज संघामध्ये घेतले आहेत. एक म्हणजे संजू सॅमसन आणि दुसरा ईशान किशन, अशात या दोघांपैकी कोणाला संघात जागा मिळेल, याबाबत माजी समालोचक संजय मांजरेकर यांनी आपले मत मांडले आहे.

संजू सॅमसनने आतापर्यंत भारतीय संघासाठी 7 टी20 सामने खेळले आहेत. तर ईशान किशनने 2 टी20 सामने खेळले आहेत. हे दोन्ही खेळाडू भारतीय संघासाठी सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरू शकतात. त्याचबरोबर मधल्या क्रमांकावर देखील हे दोन्ही खेळाडू फलंदाजी करू शकतात. अशात या दोन्ही खेळाडूंपैकी कोणत्या खेळाडूला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल यावर भारतीय संघाचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संजय मांजरेकर क्रिकेट नेक्स्टसोबत बोलताना सांगितले की, “मी यष्टिरक्षक म्हणून म्हणून ईशान किशनला संजू सॅमसनच्या अगोदर संधी देईन. कारण त्याने त्याच्या प्रदर्शनात सातत्य राखले आहे. तसे तर, ईशान किशन हा फलंदाज म्हणून माझी पहिली पसंत असेल. कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यष्टिरक्षकाला जास्त महत्त्व दिले जात नाही.”

संजू सॅमसनबद्दल बोलताना मांजरेकर म्हणाले की, “जर सॅमसन एकदा लयीमध्ये आला तर त्याला अडवणे खूप अवघड जाते. जर सातत्याताबद्दल बोलायचे झाले तर, ईशान किशन संजू सॅमसनपेक्षा खूप पुढे आहे. पण अशा परिस्थितीत श्रीलंका विरुद्ध भारतीय संघाच्या व्यवस्थापकांना कोणत्या खेळाडूवर जास्त विश्वास आहे हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

श्रीलंका-भारत मालिकेवर संकट; यजमानांच्या संघातील ‘हा’ महत्त्वाचा सदस्य आढळला कोरोना पॉझिटिव्ह

आयसीसीने धोनीसाठी शेअर केलेल्या व्हिडिओवर संगकाराने ‘ही’ प्रतिक्रिया देऊन जिंकले चाहत्यांचे मन

“रिषभ पंत असेल भारताचा पुढील कर्णधार”, पाहा कोणी केली ही भविष्यवाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---