बुधवारी (२१ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात आयपीएलच्या तेराव्या हंगामातील रंगतदार लढत झाली. मात्र या लढतीत केवळ एका युवा गोलंदाजाने ४ षटकांपैकी २ निर्धाव षटके टाकत ८ धावांवर ३ विकेट्स चटकावल्या आणि सर्वांची मने जिंकली. हा खेळाडू म्हणजे, बेंगलोर संघाचा २६ वर्षीय वेगवान गोलंदाज ‘मोहम्मद सिराज’. याच सिराजविषयी हैदराबाद रणजी संघाचे माजी क्रिकेटपटू अब्दुल अजीम यांनी अनेक खुलासे केले आहेत.
अजीम म्हणाले की, “२० वर्षांचा होईपर्यंत सिराजकडे चांगले शूजही नव्हते. पण हैदराबादच्या २ छोट्या खोलींच्या घरात राहणाऱ्या या सिराजने गेल्या ५ वर्षांत जेवढी प्रगती केली आहे. ते पाहता माझ्यासहित कित्येक मोठ-मोठे दिग्गजही चकित झाले आहेत. त्याची आई मला रोज सांगायची की, सिराजला अभ्यासात रुची नाही. तुम्ही त्याला क्रिकेटमध्ये थोडीफार मदत करा.”
“त्यावेळी तो कॉर्पोरेट संघांसाठी क्रिकेट खेळायचा. तिथे त्याला एका सामन्याचे २०० रुपये मिळायचे. मात्र मी जेव्हा त्याला पहिल्यांदा गोलंदाजी करताना पाहिले होते, तेव्हा मला त्याच्यात जास्त विशेष काही दिसून आले नाही. पण तो गरिब कुटुंबातून आला आहे. त्याचे वडील रिक्षाचालक आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन मी त्याची मदत करण्याचा निर्णय घेतला,” असे पुढे बोलताना अजीम म्हणाले.
अजीम यांनी सिराजच्या सर्वोत्कृष्ट खेळीविषयी बोलताना सांगितल की, “पुढे सिराजने चारमिनार संघात प्रवेश केला आणि लीग सामने खेळायला सुरुवात केली. म्हणून मी माझ्या काही संघ निवडकर्ता असणाऱ्या मित्रांना सांगून ठेवले की, जर हा मुलगा चांगला खेळत असेल, तरच त्याला मदत करा. अशात एका सराव सामन्यात सिराजने अनपेक्षित कामगिरी करत विरुद्ध संघाच्या ३ सलामीवीरांना तंबूत धाडलं. त्यानंतर त्याला २३ वर्षांखालील हैदराबाद संघात स्थान मिळाले.”
“मात्र त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला खरे वळण मिळाले भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांच्यामुळे. अरुण २०१५-१६ साली हैदराबाद संघाशी जुळले होते. त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिराजचे एका उत्कृष्ट गोलंदाजांत रुपांतर केले. सिराज स्वत:ही अरुण यांना त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाची भूमिका निभावणारी व्यक्ती म्हणून संबोधतो,” असे शेवटी अजीम यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
भाऊच भावाला नडला! खेळायचा होता मोठा फटका, पण झाला यष्टीचीत
धावा करण्यात मागे पडलेली सीएसके विक्रमांत मात्र आघाडीवर, पाहा काय केलाय विक्रम
ट्रेंडिंग लेख-
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!