भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत होता. मात्र, उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारताचा विश्वचषकातील प्रवास संपुष्टात आला. इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत न्यूझीलंड दौऱ्यावर 3 सामन्यांची टी20 मालिका 1-0ने जिंकली. या मालिकेतील विजयामुळे हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाचे आणि खेळाडूंच्या प्रदर्शनाचे कौतुक केले जात आहे. अशात टी20 मालिका जिंकल्यानंतर माजी निवडकर्ते चेतन शर्मा यांनी या विजयावर ट्वीट करत पहिल्यांदाच मौन तोडले आहे.
चेतन शर्मांचा बीसीसीआयवर निशाणा
टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत मिळालेल्या पराभवानंतर भारतीय संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) आणि संपूर्ण निवड समितीला बरखास्त केले होते. माध्यमांमध्ये असे वृत्त होते की, संघाच्या निवडीमुळे बीसीसीआयने मोठे पाऊल उचलत संपूर्ण निवड समिती एका रात्रीत बरखास्त केली.
मात्र, टी20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाची निवडही चेतन शर्मांच्या निवड समितीनेच केली होती. अशात मालिका विजयानंतर माजी निवडकर्त्यांनी ट्वीट करत आपले मौन तोडले. बीसीसीआयवर निशाणा साधत भारतीय संघाला टी20 विजयानंतर शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “खूपच शानदार पोरांनो. असंच चांगलं काम करत राहा.”
Well done boys. Keep up the good work. #TeamIndia @hardikpandya7
— Chetan Sharma (@chetans1987) November 22, 2022
टी20 विश्वचषक आणि न्यूझीलंड दौऱ्यातील संघांची निवड चेतन शर्मा यांनी केली होती. त्यांनी या ट्वीटमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयवर निशाणा साधला. त्यांनी सांगून टाकले की, ते चांगला संघ निवडत होते. मात्र, बीसीसीआयने त्यांना निलंबित केले. त्यांच्या मते हा बोर्डाचा चुकीचा निर्णय होता.
भारताची वनडे मालिका
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यात टी20 मालिकेनंतर आता 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन याच्याकडे आहे. या मालिकेची सुरुवात 25 नोव्हेंबरपासून ऑकलंड येथे होणार आहे. (former selector chetan sharma on ind vs nz win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात बदल; ‘या’ दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली संधी
‘या’ तारखेपूर्वी खेळाडूंना करावी लागेल आयपीएलसाठी नाव नोंदणी, बीसीसीआयने सांगितली तारीख