भारतात होणाऱ्या आगामी वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघाची संघनिवड पुढील महिन्यात होईल. या विश्वचषकात रोहित शर्मा हा भारताचे नेतृत्व करणार असल्याचे नक्की आहे. असे असतानाच निवड समितीचे माजी सदस्य राजा व्यंकट यांनी आता एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी 2011 वनडे विश्वचषकात रोहित शर्मा याला कर्णधार एमएस धोनी याच्यामुळे वगळले गेल्याचे म्हटले.
भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू तसेच 2010 ते 2012 या काळात निवडसमिती सदस्य राहिलेल्या राजा यांनी नुकतीच एका क्रिकेट संकेतस्थळाला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी 2011 वनडे विश्वचषकाच्या संघाबाबत एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले,
“2011 वनडे विश्वचषकात रोहित शर्माची निवड होणे निश्चित वाटत होते. प्रशिक्षक गॅरी कर्स्टन हेदेखील त्याच्या निवडीसाठी आग्रही होते. मात्र, कर्णधार धोनीने त्याच्या नावाला विरोध केला. धोनीला त्यावेळी संघात एक अतिरिक्त फिरकीपटू हवा होता. त्याच्यामुळे पियुष चावला संधी मिळाली.”
मायदेशात झालेला हा विश्वचषक भारतीय संघाने जिंकलेला. विशेष म्हणजे चावला या विश्वचषकात भारतीय संघातील एकमेव लेगस्पिनर होता. तसेच भारतीय संघाच्या त्यावेळीच्या फलंदाजीक्रमात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, विराट कोहली, गौतम गंभीर, युवराज सिंग, एमएस धोनी, युसुफ पठाण व सुरेश रैना हे फलंदाज होते.
एकंदरीत कामगिरीचा विचार केल्यास रोहित शर्माची आकडेवारी त्यावेळी फारशी आश्वासक नव्हती. 2007 ते 2011 या कालावधीत त्याने केवळ 20 च्या सरासरीने धावा बनवलेल्या. विश्वचषकाच्या काही दिवस आधीच संपलेल्या दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या मालिकेत पाच सामन्यात तो एकदा ही 25 चा आकडा गाठू शकला नव्हता. त्यावेळी रोहित शर्मावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली होती.
(Former Selector Raja Venkat Said MS Dhoni Dropped Rohit Sharma From 2011 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
ASIA CUP 2023 । सॅमसन-चहलला संधी न मिळण्यामागे आहे ‘हे’ कारण, स्वतः गावसकरांनी दिले स्पष्टीकरण
विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन वेळी बिश्नोईला का आठवला शाहरुख खान? रिंकूशी झालेल्या चर्चेत केला खुलासा





