माजी भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंद सध्या अमेरिकेत धावांचा पाऊस पाडत आहे. एकेकाळी १९ वर्षाखालील भारतीय संघाचा कर्णधार असलेला उन्मुक्त अमेरिकेकडून खेळण्यासाठी भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. उन्मुक्तने व्यावसायिक क्रिकेटसाठी हे पाऊल उचलले होते.
पण असे अनेक क्रिकेटपटू आहेत, जे केवळ भारताकडूनच खेळले नाहीत, तर ते इंग्लंड आणि पाकिस्तानसाठीही मैदानात उतरले होते. आज आपण अशा चार क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत. यातील तीन क्रिकेटपटू तर भारत सोडून पाकिस्तान संघामध्ये सामील झाले होते.
१. इफ्तिखार अली खान पतौडी
इफ्तिखार अली खान पतौडी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांसाठी कसोटी सामने खेळले होते. मात्र दुसऱ्या महायुद्धामुळे त्यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. त्यांनी आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत ६ कसोटी सामने खेळले होते.
भारतात जन्मलेला इफ्तिखार इंग्लंडला शिकण्यासाठी गेले होते. अभ्यासाबरोबरच ते क्रिकेटही खेळत असत. त्यांचा उत्कृष्ट खेळ पाहून इंग्लंडने त्यांना राष्ट्रीय संघात समाविष्ट केले. ‘सीनियर पतौडी’ म्हणून ते प्रसिद्ध होते, त्यांनी इंग्लंडसाठी ३ कसोटी सामन्यांमध्ये १४४ धावा केल्या. त्यात त्यांनी एक शतकही केले होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर इफ्तिखार अली खान पतौडी भारताकडूनही खेळले. त्यांनी ३ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. यापैकी एकामध्ये भारताचा पराभव झाला. २ कसोटी सामने अनिर्णित राहिले होते. ‘सीनियर पतौडी’ यांचे पुत्र मन्सूर अली खान देखील भारताकडून खेळले होते, त्यांची गणना भारताचा पहिला दबंग कर्णधार म्हणून केली जाते.
२. गुल मोहम्मद
गुल मोहम्मद हे भारताचे दुसरे क्रिकेटपटू होते, ज्यांनी दोन देशांसाठी कसोटी सामने खेळले होते. गुल मोहम्मद यांनी भारतासाठी १९४६ ते १९५२ पर्यंत ८ कसोटी सामने खेळले. त्यानंतर १९५२ मध्ये गुल मोहम्मद पाकिस्तानला गेले.
गुल मोहम्मदने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना १९५२ मध्ये खेळला. यानंतर ते १९५६ मध्ये पाकिस्तानकडून मैदानात उतरले. ते पाकिस्तानसाठी फक्त एक कसोटी सामना खेळू शकले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण ९ कसोटी सामने खेळले.
३. अब्दुल हाफिज
अब्दुल हाफिज गुल मोहम्मद सारखेच दोन देशांकडून खेळले होते. ते भारतासाठी ३ कसोटी सामन्यांमध्ये मैदानात उतरले होते. त्यानंतर ते पाकिस्तानला गेले. अब्दुल हाफिज यांनी पाकिस्तानकडून २३ कसोटी खेळले. त्यांची एकूण कारकीर्द २६ कसोटी सामन्यांची होती.
४. अमीर इलाही
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडून खेळलेले अमीर इलाही हे तिसरे क्रिकेटपटू आहेत. ते १९४७ मध्ये भारतासाठी एक कसोटी सामना खेळले होते. त्यानंतर ते पाकिस्तानला गेले आणि आणखी पाच कसोटी सामने खेळले. त्याची एकूण कारकीर्द ६ कसोटी सामन्यांची होती.
महत्त्वाच्या बातम्या –
आर अश्विनला विराट कोहलीच्या नेतृत्वाचा होता त्रास, बीसीसीआयकडे केली होती ‘अशी’ तक्रार?
रोहित की सूर्यकुमार, कोणाला बाद करण्यात जास्त मजा आली? रवी बिश्नोईने घेतले ‘हे’ नाव
“धोनीला भारतीय संघात आणणे याचा अर्थ कोणालाही कमी लेखणे असे नाही”






