कोल्हापूर ताडोबा टायगर्स विरुद्ध पुणे पलानी टस्कर्स यांच्यात प्रमोशन फेरीच्या पाचव्या दिवशी पहिली लढत झाली. तीन विजयासह दुसऱ्या स्थानी असलेल्या कोल्हापूर संघ तर काल तोंडाशी आलेला पुणे संघाचा विजय मुंबई उपनगर संघाने हिसकावून घेतल्याने गुणतालिकेत पुणे संघाला सहाव्या क्रमांकवर जावे लागले होते.
सामन्याच्या सुरुवातीला कोल्हापूर संघाच्या तेजस पाटील व ओमकार पाटील यांनी आक्रमक खेळ केला तर त्यानंतर पुणे कडून आर्यन राठोड व संकेत लांडगे ने चपळाई दाखवत सामना 10-10 असा बरोबरीत आणलं होता. त्यानंतर कोल्हापूरच्या चार ही चढाईपटूंनी गुण मिळवत संघाला आघाडी मिळवून दिली. वैभव रबाडे व साईप्रसाद पाटील ने बचावफळीत उत्कृष्ट खेळ केला.
कोल्हापूर संघाच्या सांघिक खेळाच्या जोरावर त्यांनी पुणे संघाला मध्यांतरापर्यत 2 वेळा ऑल आऊट केले. 34-14 अश्या आघाडी नंतरही कोल्हापूर संघाने आक्रमक खेळ सुरू ठेवला. कोल्हापूर संघाने अखेर सामना 53-36 असा जिंकत चौथा विजय मिळवला. कोल्हापूर संघाकडून ओमकार पाटील ने 14 गुण मिळवले. तर वैभव राबाडे ने पकडीत 10 गुण मिळवत विजयात महत्वपुर्ण भूमिका निभावली. साईप्रसाद पाटील सुद्धा 6 पकडी करत हाय फाय पूर्ण केला. पुणे संघाकडून संकेत लांडगे ने 12 गुण मिळवले. तर ऋषिकेश पाटील ने हाय फाय पूर्ण केला. (Fourth win for Kolhapur Tadoba Tigers in the promotion round)
बेस्ट रेडर- ओमकार नारायण पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
बेस्ट डिफेंडर- वैभव रबाडे, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
कबड्डी का कमाल- ओमकार नारायण पाटील, कोल्हापूर ताडोबा टायगर्स
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
युवा कबड्डी सिरीज मध्ये प्रमोशन फेरीच्या चौथ्या दिवशी झाल्या चुरशीच्या लढती
चार वर्षानंतर हैदराबादमध्ये खेळणार वॉर्नर! आकडेवारी पाहून सनरायझर्सलाच फुटेल घाम